पान:माधवनिधन.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन. माधव-आमचे आजोबा जे दादासाहेब त्यांच्या हातांतला हा ताईत आहे, असं बाबासाहेब पत्रांत लिहितात; मग तो वडिलोपार्जित जिन्नस आपल्याजवळ ठेवायला काय हरकत आहे ? बलवंत-पण तो आजपर्यंत नव्हता आणि आतां आला कोठून ? अशी सहजच दुसन्यास पाहिल्यावर शंका यायची! त्यांतून नानांच्या दृष्टीस पडला की, त्याची चिकीत्सा मग झाल्यावांचून रहावयाचीच नाही ह्मणून ह्मणतों माधव-बरं, तसं तुमच्या मर्जीप्रमाणेच का होईना ! ध्या हा, जातांनाच मला द्या ह्मणजे झालं! बरं पण राव तुझी जाणार केव्हां ? बलवंत-लवकरच जाईन ह्मणतों! [ ताईत घेतो] माधव--राव, जेव्हा जेव्हां तुझी पुण्यास येतां, तेव्हां तेव्हां तुमाला परत जाण्याची मोठी घाई असते. बलवंत-नोकरी तेथे पडली आणि ती इमानदारीनं आणि सावधगिरीने केली पाहिजे तेव्हां नाईलाज आहे. नाही तर बाजीरावसाहेबांचे आणि श्रीमंतांचे चरण सोडून मी कधीच दूर गेलो नसतों. नाना-[आपल्याशी रागानें ] अरे फितुऱ्या, काय पण इमानदारीने आणि सावधगिरीने चाकरी करीत आहेस? तुला बाजीरावाचे चरण सोडून जाण्याची इच्छा नाहींना ? त्याच किल्लयांतील अंधारकोठडीत तुमची स्थापना करतो, ह्मणजे जन्मभरपर्यंत तुला बाजीरावाचे चरण अंतरणार नाहीत. माधव-आतां गणपतीचा उत्साह जवळच आला आहे, तेवढा केल्याशिवाय जायचं नाहीं; अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे. बलवंत-श्रीमंतांची आज्ञा कोण मोडील ? बराच वेळ झाला येतों मी! माधव-या. रोज भेटत जा. नाना-[ आपल्याशी ] चोर मुद्देमालानिशी चांगला सांपडला आहे. पहातों आतां येथून कसा सुटून जातो तें ! कोंडानी, मी सांगेन तसं ताब. डतोब कर. अगदी मागे पुढे पाहूं नकोस ?