पान:माधवनिधन.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हेका धरला त्या, आणि त्याच्या मर्जीविरुद्ध जर आपण एखादी गोष्ट केली, त्याला लहानपणी जसे आपण वागविले तसे आतां तरुणपणांतही वागवं व त्याने वागले पाहिजे; आपण जे करतो, ते त्याच्या कल्याणाकरितांच करतो असे समजून जर पूर्वपद्धतीप्रमाणेच वर्तन ठेवले तर ते सवाई माधवरावासारख्या तरुण, पाणीदार आणि हुशार राज्याधिकाऱ्याला कितपत रुचेल, याचा नानांनी विचार केला नाही, अथवा नागनाथाच्या कारस्थानाने को. धवश झाल्यामुळे या गोष्टी त्यांच्या मनांत आल्या नाहीत; असा परस्परांचा परस्पराविषयींच्या हेतूबद्दल गैरसमन होऊन त्यांच्यामध्ये तेडे पडत चालले, आणि त्या गैरसमजाचा परिणाम माधवरावाने केलेली आत्महत्या होय. दोघांनी जर थोडथोडा विचार केला असता, तर असा दुर्धर प्रसंग कदाचित् न येता; ह्मणजे दोषाचे ओझें थोडथोडे दोघांवर येते. एकेकट्याच्याच डोक्यावर सर्व भार देणे बरोबर होणार नाही. राजा तरुण, दिवाण जुना केलासवरलेला, दिवाणाला आपल्या अनुभवजन्य ज्ञानाची ऐट, आणि तरुण राजपुत्राला आपल्या मालकपणाची तानी येत चाललेली गुर्मी; तेव्हां दोघांचे फार दिवस न जुळून असा काही तरी भलताच प्रसंग होतो, याचा अनुभव सर्वकाळी, सर्व देशांत आणि सर्व ठिकाणी सारखाच दृष्टीस पडतो. असो. एकमेकांच्या हेतूबद्दल एकमेकांचा गैरसमज आणि त्याचा परिणाम; ही या नाटकाची मूळ कल्पना आहे. त्यांत मग बाजीरावाचे कारस्थान, नानाची माधवरावाच्या प्रत्येक गोष्टीवर, हालचालीवर, आणि बारीकसारिक कृत्यावर सक्त देखरेख; त्यामुळे त्यांना उत्पन्न होणारा वैताग, नागनाथाचा बेइमानपणा, बाजीरावाचे गुणानुवाद त्यांच्या कानी पडल्यामुळे त्यांची भेट घेण्याची माधवरावाला उत्पन्न झालेली उत्सुकता, नानाचा त्याला प्रतिबंध, आपल्या गुणी समजलेल्या अशा आप्ताबद्दलचे साहाजिक उत्पन्न झालेले प्रेम ही कारणे अंगभूत आहेत. या सर्व गोष्टी पेशव्यांची बखर चांगली चाळली ह्मण खऱ्या आहेत असें अनुभवास येईल. फक्त बलवंतराव नागनाथाची बायको सत्यभामा तिने केलेला आतताईपणा मात्र ग्रंथकाराच्या कल्पना सुष्टींतला आहे.