पान:माधवनिधन.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरी लिहिणाराला आपला विषय अगर संविधानक चांगले चटकदार आणि मनोरंजक होण्याला काही थोड्याशा गोष्टी आपल्या पदरच्या घालण्यास मोकळीक दिलेली आहे. त्या किती प्रमाणाने त्यांत घालाव्या, अथवा त्या घातल्या असतां मुख्य गोष्ट आणि दुसरी गोष्ट या अगदी विलग दि. साव्या; एवढ्याबद्दल खबरदारी घेतली ह्मणने बस्स झाले, असे साधारण मत आहे. इतकीही मोकळीक जर ग्रंथकाराला मिळणार नाही तर तें ऐतिहासिक नाटक अगर कादंबरी होणार नाही. निव्वळ इतिहास होईल, अथवा भलतेच कांहीं तरी होईल. सवाईमाधवरावांच्या मृत्यूला कारण सवाईमाधवरावाचा केवळ अविचार, अथवा नानांचा त्यांच्यावरचा सक्त पाहरा, किंवा विविधज्ञानविस्तारांतून प्रसिद्ध झालेल्या 'सवाईमाधवरावांचा मृत्यू ' या पुस्तकांत माधवरावाच्या मृत्यूला व वेडेपणाला जे कारण दाखविले आहे, यापैकी एकेकच केवळ कारण आहे असे नाही. रा. भानूनी आपल्या 'नाना आणि महादजी' या. निबंधांत माधवरावाच्या मृत्यूचा सर्व दोष माधवरावाच्याच माथी मारून त्याला अगदी अविचाराचा पुतळा बनविला आहे. इंग्लीशग्रंथकारांनी त्यांच्या मृत्यूचा सर्व दोष नानांनी त्याच्यावर कडक पहारा ठेवला ह्मणून सर्व. स्वी त्याच्यावर लादला आहे. यापैकी एकेकच त्यांच्या मृत्यूला खरोखर कारण आहे असे नाही. याबद्दल रा. खरे यांनी आपल्या 'नाना फडणवीसांच्या चरित्रांत' जे कारण दिले आहे तेंच बहुतेक अंशी खरे आहे. असे मला वाटते. नाना कोणत्या हेतूंनी आपल्यावर देखरेख ठेवतात, त्यांच्या मनांतून आपल्याला स्वतंत्रतेने वागू देऊ नये, वागू दिले असतां आपले वजन राहील की नाही, पूर्वीपासून जसे आपण कुलमुखत्यारीने कारभार करतो तसाच पुढेही आजन्मपर्यंत करावा अशी त्यांना खरोखर इच्छा आहे किंवा ते आपल्या कल्याणाकरितांच सर्व गोष्टी करीत आहेत; या गोष्टी माधवरावाला कळल्या नाहीत; कांही गोष्टी मुखत्यारीने करण्याला आपणाला अधिकार आहे, या सर्व राज्याचे आपण मालक आहोत, अशी दृढ समजूत झालेल्या आणि खरोखर तशी स्थिती असलेल्या मनुष्याने ज्या गोष्टीचा