पान:माधवनिधन.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ कोंडाजी-[आपल्याशी ] नानासाव लई रागावलं आहीत, असं त्यां. च्या चेहऱ्यावरनं दिसतया. त्या पागेदार बामनाची आतां शंभर वर्स भर• लींच ह्मणायची! माधव-बाबासाहेबांची आणि माझी गांठ केव्हां पडेल, माझ्या सर्व आप्तस्वकीयांना मी केव्हां एकदा भेटेन असं मला झालं आहे, त्यांच्याशिवाय माझी आप्तस्वकीय मंडळी आहेत कोण ! वेळ पाहून नानांना याबद्दल विचारायचं ? आपलं वैभव पहायला, आपण एखादं चांगलं कृत्य केलं ह्मणजे त्याचं कौतुक करायला जर आपली आप्त मंडळी नाहीत, तर मग शेंकडों बाहेरच्या मंडळीला घेऊन करायचे काय? दाणे नसले झणजे मग उडून जाणान्या पांखराप्रमाणेच त्यांची स्थिती. नाही; माझी मंडळी माझ्या जवळ पाहिजेत. बलवंत-ज्याप्रमाणे श्रीमंतांना बाबासाहेबांचा निदिध्यास लागला आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांसही श्रीमंतांचा लागला आहे. पण तो योग येईल तेव्हां खरा ! आप्पासाहेबास तर प्रत्यही श्रीमंतांची आठवण होते. नाना-[ आपल्याशी ] असं, असं ! सापाच्या पिलांना घरांत मोकळं सोडीन इतका मी मूर्ख नाही! अंगावर प्रथम चढतांना ती मऊ आणि गार लागतात, पण परिणामी प्राणघातक; हे यांना पोरवयामुळे कळत नाही. माधव-पाहूं बाबासाहेबांनी माझ्याकरितां काय चीज पाठविली आहे ती! बलवंत-ही घ्यावी. ही श्रीमंतांनी आपल्या जवळ ठेवावी अशी त्यांची इच्छा आहे; आणि ती कोणाच्या नजरेस न पडेल अशी तनवीन ठेवावी. माधव-[ताईत घेऊन पहातो] हे काय बरें आहे ? मला वाटतं ताईत आहे. मी हा असा मणगटांत बांधीन अगर माझ्या यज्ञोपवीताला बांधून ठेवीन. याच्यावर नकशीचं काम मोठं सुबक केलं आहे. बलवंत-आणखी एक माझी श्रीमंतापाशी विनंती आहे. माधव-कोणची ती? बलवंत-मी जोपर्यंत येथे आहे, तोपर्यंत हा ताईत मजजवळ असं द्यावा, मी परत जातांना श्रीमंतांना देऊन जाईन. ह्मणने तो कोदन आला कसा आला याची चौकशी आजच व्हावयाची नाही..