पान:माधवनिधन.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन. वंतरावा, तूं माझा मोठा विश्वासूक ह्मणून तुझ्यावर मी इतका विश्वास ठेवला, त्याचें हरामखोरा हे चीज ! आग, आग, अंगाची अगदी नखशिखांत आग होऊन गेली आहे. ज्याला घर राखण्याकरितां रखवालदार ह्मणून ठेवला, तोच जर बेइमान होऊन तेथेच दरोडा घालू लागला, तर तेथे मालक मोठा शहाणा असून करतो काय ? कोंडून ठेवलेला साप, कसं आणि कोठं बीळ पाडील याचा नेम नाही; हे आतां माझ्या प्रत्ययाला आलं. बरं ह्मणावं, हा नाना फडणवीस तुमाला गारुडी मोठा वस्ताद मिळाला आहे. तुमचे दांत पाडून तुह्माला पेटाऱ्यांतच घालून ठेवील; तुमच्या कसल्याही गमजा कधीही चालू देणार नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. सर्व पेशवाईचा मी कारभार करतो, सर्व दुनियेतल्या खबरा रोज मला कळतात, असं असून हे घरांतलं कारस्थान मला कळत नाही, तर मग मी कारभार करतों कसला ? साडेतीन शहाण्यापैकी लोक मला अर्धा शहाणा ह्मणतात, पण मी ह्मणतो की मी पुरा मूर्ख; ज्यांना आपल्या जवळ, अगदी पायाखाली आणि आपल्या घरी काय चाललं आहे तेंही पुरतं समजत नाही, आणि जगाच्या उलाढाली व कारभार मात्र जे रात्रंदिवस करीत बसतात, तेही मनप्रमाणे सगळे मूर्खच समजले पाहिजेत. पाहूं आणखी काय काय प्रकार होतात ते! माधव-बरं तो काय जिन्नस आहे, ते मग पाहूं ! प्रथम बाबासाहेब या पत्रांत काय लिहितात ते पाहिले पाहिजे. [ पत्र फोडून वाचतो, आनंदाने हांसून ] बाबासाहेबांच्या नेहमींच्या पत्राप्रमाणे हेही त्यांचे पत्र प्रेमानं अगदी भरलं आहे. राव पहा तर खरं एकदा हे पत्र वांचून ! लिहितात इतकी माझी योग्यता आहे कांहो राव ! ( पत्र त्याच्या हाती देतो.) वलवंत-हः [ पत्र परत करून ] त्यांच्या मनाचं यांत खरं प्रतिबिंब दिसत आहे. • नाना-[ आपल्याशी ] यांचा पत्रव्यवहार यावरून बऱ्याच दिवसापासन चाललेला आहे ह्मणायचा ? हैद्राबादवाल्या निजामाच्या राज्यांतील अंधाधुंदीला, काही आझाला आतां हंसायला नको.