पान:माधवनिधन.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्षे ७ आहे; आणि ते प्रेम जर या जन्मांत नष्ट होणार नाही आणि कदाचित् झालं तर ते या देहाबरोबरच नष्ट होणार; तर बलवंतरावांची आठवणही नष्ट होणार नाही, आणि झाली तर ती तेव्हांच नष्ट व्हावयाची. गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, सिंधु, नर्मदा वगैरे पापविनाशी आणि पुण्यकारक पवित्र नद्यांचे प्रचंड प्रवाह आणि ज्या प्रदेशांतून त्या वाहतात ते प्रदेश जसे वंदनीय, तसेच त्यांचे उगम आणि त्यांची उगमस्थानं, ही जरी ती लहान आहेत, तरी ती तितकीच वंदनीय होत. (थोडे थांबून ) बरं आमचे बाबासाहेब, त्यांचं कुटुंब, आप्पासाहेब, अमृतरावसाहेब वगैरे मंडळी कुशल आहेतना ? बाबासाहेबांची काय आज्ञा आहे. काही पत्र, निरोप वगैरे कांहीं आहे का? - बलवंत-( इकडे तिकडे पाहून ) नुसतं पत्र निरोपच नाही, तर आगखीही बाबासाहेबांनी श्रीमंतास देण्याकरितां एक वस्तु दिली आहे. - माधव- ( अति उत्सुकतेनें ) काढा, द्या, लवकर द्या, जे काही द्यायचं असेल तें झटपट काढा. (बलवंतराव हलकेंच खिशांतून ताईत व पत्र काढतो. इतक्यांत नाना साहेब व कोंडाजी येऊन चोरून पहातात.) बलवंत हें माधव-(हात पुढे करून ) द्या. बाबासाहेबाकडची एवढीशी चिठ्ठी, अगदी लहानशी जिन्नत-मग ती कितीही हलक्या किंमतीची असो, ती मला मोठमोठ्या मौल्यवान जिन्नसापेक्षाही मोल्यवान आहे; आणि ती मोठ्या आदरानं घेणार व मोठ्या प्रेमानं आपल्या जिवापलिकडे जतन करून ठेवणार. कोंडानी-( हळूच नानाकडे पाहून ) सरकार बघा आतां. मी खोटं ह्मणतोय की काय त्यो ! नाना-( आश्चर्ययुक्त होऊन आपल्याशी) काय राज्यबुडव्या दादासाहेबांचा आणि राक्षसीण आनंदीबाईचा पुत्र बाजीराव, याचा आणि श्रीमं• ताचा पत्रव्यवहार मुरूं असून परस्परांकडे भेटीच्या जिन्नसाही जातात आणि येतात, अं! आणि त्या या हरामखोराच्या मार्फत ! अरे दरोडखोरा ! बल