पान:माधवनिधन.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन.. कारवी याच्यासंगं लई वढाळ गुलगुल गोष्टी करत्यात, तवा असा हा कोना लेका तालेवाराचा ल्योक कां नातु. आपनासनी त्ये कायबी कलत नाही, आ. पुन बिगीबिगी जाऊनशानी नानासाहेबासनी ही वर्दी द्यावी, आन् त्याना घेऊन येऊन हे समदं लपून दावावं ह्मणजे आपुन आपली कामगिरीबी बजावलीसारखी होईल, त्यांना इस्वासबी येईल, आन् आपल्या डोष्यांनं पाहन त्येची चांगली खात्री बी होईल. मनजे कोंडाजीचं इनाम पटलं. [ जातो.] माधव-( उत्सुकतेने ) राव, तुमच्याकडचा मनुष्य, तुमच्याकडचे पत्र, निदान लहानशी चिठी, आली ह्मणजे मला मोठा आनंद होतो; त्यांतून तुझी प्रत्यक्ष आलांत, तुमची एकदां भेट झाली, तिकडील सर्व कुशल वर्तमान कळलं, ह्मणने मग ओ मला आनंद होतो तो तर शब्दानं मला कोणालाच सांगतां येणार नाही. तुझी माझी आणि बाबासाहेबांची ज्या दिवशी प्रथम पत्राने मेट करून दिलीत, त्या दिवसापासून माझ्या सुखाला आरंभ झाला. माझ्या सगळ्या जन्मांतला तो एक मोठा सुदीन होता असं मी समजतों; आणि त्याची व तुमची आठवण मी या जन्मांत कधीच विसरणार नाही. बलवंत-या गरीब दासाची श्रीमंतांना सदोदित आठवण रहावी, याशिवाय श्रीमंतांच्या चरणाजवळ माझं काहीएक मागणं नाहीं; मी त्यांतच आपणा स्वताला कृतार्थ मानतो. श्रीमंताच्या सेवेला आज माझ्यासारखे लक्षावधी सेवक तयार आहेत, असे असून माझी जर श्रीमंतास आठवण राहिली, तर मग मी आपणास खरा भाग्यवान कां समजू नये ! खरोखर मग माझ्या माग्यास पारावारच नाही. माधव मोठ्या लोकांना, त्यांतून राजे लोकांना हलक्या लोकांची आणि त्यांना दिलेल्या वचनाची वेळ गेली ह्मणजे आठवण राहत नाही, अथवा ते ठेवीत नाहीत; हे जरी बहुतेक अंशी खरे आहे; तरी तुमच्याबद्दलची आठवण मी विसरेन असे मला मुळीच वाटत नाही. कारण ज्या प्रेमाचा माझ्या मनांत उद्भव होण्याचा मुळींच संभव नव्हता; तो आनंद, तें सुख आणि ते प्रेम माझ्या मनांत उत्पन्न होण्याला सर्वांशी कारण तुझी आहांत. जोपर्यंत ते प्रेम आणि आनंद कायम आहे, तोपर्यंत रावांची आठवणही कायमच