पान:माधवनिधन.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ घरचं दुसरं कोणीच नाही. बाबासाहेबाची, आप्पासाहेबाची आणि अमृतरावसाहेबाची अशी आमची सर्वांची व सर्व आश्रितांची, कुटुंबे एका ठिकाणी होऊन मग हे असे समारंभ आह्मी डोळ्याने पहावे असे मला वाटतं. बाबूराव असं माझ्या मनाप्रमाणे होईल कां रे? सध्या तर बाबासाहेब एकीकडे आणि मी. एकीकडे !! बाबूराव-श्रीमंतांच्या मर्जीप्रमाणे सर्व काही होईल. यंदा नाहीं पुढल्या वर्षी. एक मु.-[ घाबऱ्या घावऱ्या ] बाईसाहेब, बाईसाहेब, ती पहा सरकारस्वारी सज्यांत गाणी ऐकत उभी आहे. यशोदा-अगं खरंच ! [ सर्वजणी उठतात. ] माधव-बाबूराव, बाबूराव, त्यांनी आपल्याला पाहिलं वाटतं. त्या पहा गडबडीनं उठल्या. आपण त्यांच्या रंगाचा फुकट बिघाड केला. चल आपण आंत जाऊं. [जातात.] मैना-बाईसाहेब, फराळाची पाने मांडून तयार आहेत. यशोदा-बरंच झालं. चला सर्वनणी फराळाला. [ सर्व जातात. ] प्रवेश ५ वा. स्थळ-आरसे महाल. पात्र--श्रीमंत माधवराव पेशवे आणि बलवंतराव नागनाथ बोलत बसल आहेत, बाहेरच्या बाजूला कोंडाजी हळंच ऐकत उभा आहे. कोंडाजी-[आपल्याशी हळूच आडून ] आता हा पागेदार बामन आला आहे, हा शिरमंत सरकाराजवल लई वढ़ल खलबात करीत बसल. हाचमन सरकार याच्याजवल कसलं रोज रोज खलबत करत्यात कोणास ठावं ! का एखाद्या गनिमावर सवारी करण्याचा बेयत करत्यात, की कुनाचा किल्लं काट घण्याचा बेयत करतात, कां हो बामन दुसऱ्या कुनाची सरकार जवळ चुगली खाऊन त्याचा गांव, इनाम, दौलत जप्त करून ती आपन मटकावनार, काय आहे तरी काय ह्य कारस्थान. कांहीं बी उमगत नाही.. आन आक्सी सर