पान:माधवनिधन.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन. ( आरती करून मंगलागौरीला पुष्पांजळी वाहतात आणि आरतीचें तत्रक खाली ठेवतात.) यशोदा-आतां किनई फराळाची तयारी होईपर्यंत आपण सर्वजणी झोपाळ्यावर बसून देवाची गाणी ह्मणूं... स. मुली–ठीक आहे. । यशोदा-फराळ झाल्यावर मग फुगड्या, झिंमा, सोंगट्या, छपापाणी, आंधळी कोशिंबीर, शिवाशिवी खेळू. मैने, अगं मैने-- मैना--जी, जी बाईसाहेब. यशोदा-फराळांची पाने मांडिली. की, मस आझाला कळवायला ये. तोपर्यंत आमी झोपाळ्यावर बसून गाणी ह्मणतों.. मैना-जी होय बाईसाहेब. [ जातेः ] सर्वजणी झोपाळ्यावर बसून गाणी ह्मणतात. ] [इतक्यांत श्रीमंत माधवरावसाहेब व बाबूराव फडके असे हातांत - हात घालून हलके हलके येतात.] माधवराव (कान देऊन ऐकून ). बाबूराव, वरून कांही चांगलं ऐकू येत नव्हतं. आतां येथून चांगलं स्पष्ट ऐकू येईल नाही रे ! बाबूराव-होय सरकार ! [ दोघे कान देऊन ऐकतात. ] माधव-[ आनंदानें ] गड्या, यांचे गळे कितीरे चांगले आहेत. यांची ही कानाला गोड लागणारी गाणी नुसती ऐकतच रहावं असं वाटतं. बाबूराव, यांत तुमच्या राणीसाहेबरे कोणच्या ! . बाबूराव-( हांसतो ) सरकार माधव-अरे त्यांत लाजायचं काय! आपलं माणूस दाखवायला का कोणी लाजतं! ज्याने नुकतंच लक्ष संवालक्ष सैन्याचं आधिपत्य केलं, त्या तुझ्यासारख्या वीरांनी अशा कामाला लाजायचं आणि भ्यायचं!. सांग सांग तर खरं ! नांव घेऊन सांगितलंस तर बरंच होईल. -- बाबूराव-मातोश्रीजवळ जी. बसली आहे.माधव-असं काय! या सर्व मुलीमध्ये ती एकटीच आहे. आमच्या