पान:माधवनिधन.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ रात्रंदिवस त्यांना जपणं हे त्यांच्या, आपल्या आणि सर्व देशाच्या कल्याणाकरितां करण्याचं माझं आणि सर्वांचं कर्तव्यकर्मच आहे, आणि ते मला केलंच पाहिजे. (जातो.) व प्रवेश चवथा. स्थळ-शनवारचा वाडा. पात्रे-यशोदाबाई आणखी काही मुली मिळून मंगलागौरीची पूजा वगैरे करीत आहेत. यशोदाबाई-( मंगलागौरीला फुले वाहून ) तुझी वाहिली कां फुलं ? तुझी वाहिली. तुझी दुर्वा वाहिल्या. तुमाला पत्रया मिळाल्या ? ही ठेवा गौरीपुढे दक्षणा! ( सर्वांना देते.) मुली–अहो आमाला सर्व मिळालं ? यशोदाबाई-आतां काय, धूपदीप लावून नैवेद्य दाखवून मग आरती करायची ना ? सर्वमुली-हो. यशोदाबाई-आरती सर्वजणींनी मोठ्यानं चांगली गळ्यावर झटली पाहिजे. तोंडातल्या तोंडांत किंवा हळू अथवा चुकवाचुकवी करून नाही उपयोगी! (एका मुलीकडे पाहून) आपण दुपारी गुळमुळीतच ह्मटली होती. मी जवळ असून मला देखील पुरती ऐकू आली नाही, तर बाकीच्याना कशी येईल. पण आतां या वेळेला मात्र तसं काही चालायचं नाही बरं कां! पुन्हां मग एकटीला ह्मणावी लागेल आमचं कांहीं जात नाही. आमच्या कानी सात खडे.. एक बरं मोठ्यानी ह्मणूं ! (दुसरीकडे पाहून ) आपल्याला देखील निराळं सांगायला नको.. (सर्वजणी उभ्याने मोठ्याने गळ्यावर आरती ह्मणतात.) यशोदाही तर नेहमीच आहे. तुह्माला येते ना दुसरी ह्मणा पाहूं. एक मुलगी-[ दुसरी आरती ह्मणते. ]