पान:माधवनिधन.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सप्टेंबर १८९९] माधवनिधन. नाना-ह:, बरं तुझी बदली सध्यां तेथल्या हलकाऱ्यांत केली आहे. तूं तेथें आजपासून काम देत जा. जमादाराला तुझ्याबद्दल वर्दी दिली जाईल. कोंडाजी-(मुजरा करून ) धनीसाहेब अक्सी कामांत असनार तवा खबरबी कशी घ्यावी ? नाना-तूं नुसती आल्याची वर्दी देऊन येत जा. जा, आपल्या कामाला, आणि नीट सरकारची नोकरी चांगली इमानेइतबारे करीत जा, नाहीं. तर खोड्यांत पडशील. जा. कोंडाजी-(पुनः मुजरा करून ) जी; धनीसाहेब अगदी हुकुमापरमानं करीन. [ जातां जातां आपल्याशी ] कोंड्या कामाट्याचा आतां कोंडाजी हलकारा आज झालों की नाय. एंवरे बहादर! (मिशी पिळतो) आतां थोड्या दिसांत शिरमंताचा हुजऱ्या होईन, आन मग हुजऱ्याचा नाईक होईन नाईक. मग तर ती फुटाणी मैना माझ्या पाया पडत झकत् येईल की नाही? आतां या केरसुनीला आन् त्या पोत्यराला घेऊन करायचं काय? नग इचिभन ही ! लई दिसांनी हातांतली सुटली. आतां तिला माझ्या हाताची घान येईल. (वास घेतो ) कशाला नांव घेता. आतां नदीवर जाऊन म्हसरं धुतल्यावानी चक्क अंग धुतो, ह्ये मुंडासं, हो चोळणा, ही बंडी घेतो एकाद्या भिकाऱ्याच्या पोराला; आन् झकपाक पोशाक करतो की समदं जन ह्मणतील एवं रे कोंडाजीराव. ( आनंदानें मिशा पिळीत जातो.) . नाना-(आपल्याशी ) मोरोपंत, दाजीबा व बलवंतराव नागनाथ यांच्या हातून गैरशिस्त गोष्ट होईल, अथवा कोणतीही गोष्ट ते माझ्यापासून चोरून ठेवतील असें नाही. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण जोपयंत लावलेल्या रोपाचा मोठा चांगला जोमदार वृक्ष बनला नाही, तोपर्यंत त्याचं, लागणाऱ्या किडीपासून रोज पाहून, त्याच्यावर लक्ष ठेवून रक्षण केलं पाहिजे. उत्तम मौल्यवान जरतारी वस्त्राला एकदा कसर लागली ह्मणजे ती जसं मग त्याचं जाळं करून ती अगदी मातीमोल करून टाकते, त्याप्रमाणे अपक्व अशा राजपुत्रांच्या किंवा आपल्या पुत्राच्या सुंदर मनोरूपी वसनाला दुर्व्यसनाची एकदां कीड लागली की, झालीच त्याची माती! तेवढ्याकरता