पान:माधवनिधन.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ ह्याच्या सांगण्यांत खरेपणा आहे किंवा हा आपला काही तरी सांगत आहे असें ह्मणावें ? त्यांची दृष्टी मंद, त्यांचं लक्ष कमी आणि याची दृष्टी तीक्ष्ण, आणि याचं लक्ष विशेष, असं याच्या सांगण्यावरून समजायाचं किंवा काय? हैं एक मोठं गूढ आहे. हा कामाठी, याच्या बोलण्यावर विश्वास काय ठेवायचा आहे; एवढ्यावरून यानं सांगितलेल्या गोष्टीकडे काना डोळा करणं बरोबर होणार नाही. दैववशात् याचीच गोष्ट मागून प्रत्ययास आली ह्मणने, मग त्यासारखी फजिती कोणचीच नाही. एखादे वेळी हलक्या मनुष्याच्या नजरेस जी गोष्ट पडते, ती मोठ्याच्या पडणं कधीच शक्य नसतं. कारण ती करणारे लोक 'हा वेडगळ व मूर्ख आहे, याला हे काय कळणार आहे' अशा नुसत्या समजुतीवर फार करून, या अशा हलक्या मनुष्याकडे दुलेक्ष करतात आणि शेवटी आपली समजूत चुकीची झाली असं त्याचं त्यांनाच मग वाटू लागतं, तसं होऊ देणं योग्य नाही. हा लेकाचा तेथील कामाठी भलतंच सांगेल कशाला ? त्याला त्यापासून फायदा काय ? काही नाही. त्यानं जेव्हां ही गोष्ट मला दोन तीन वेळ संधि साधून, युक्तीनं माझ्या जवळच सांगण्याचं धैर्य केलं; तेव्हां त्यांत काही तरी अर्थ असावा. जर कदा. चित् त्यांत कांहीं तथ्यांश निघाला नाही तर दिलं सोडून; तेव्हां त्याचं ऐ. कून पहावं हे बरं ! कोंडाजी,कोंडाजी-( हात जोडून ) जी धनीसाहेब नाना-तूं आजपर्यंत जसं सरकारच्या कामावर लक्ष ठेवलंस तसंच ने. हमी ठेवीत जा. ते पागेदारं आणखी काय करतात, काय काय बोलतात, याची बातमी ठेवून मला येऊन कळवीत जा! कोंडाजी-त्ये मी अक्षी डोळ्यांत तेल घालून रात दिन कावळ्यासारखा बघत राहीन, पण सरकार मला माझ्या कामाट्याच्या कामामुळं फुरसत मिलल तवा. मी जवा तथं काम करत असतो, तवा तथं जे माझ्या ध्यानांत येतं त्येवढं मी धनीसाहेबाजवळ येऊनशानी सांगेन. काम जर दुसरीकडं असलं तर सरकार म्यां काय करावं. त्ये मला सोडता येत नाहीं; आन् ध्यांतून फुरसातबी मिलत नाही.