पान:माधवनिधन.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९] माधवनिधन. आहे. बाजीरावसाहेबांची, श्रीमंत पंतप्रधानाकडे ही कामागरी घेऊन आली यंदा गणपती उत्सवाकरितां पुण्यास जाणार. सत्यभामा-आणि परत केव्हां यायचं ? बलतंवराव-परत दसरा झाल्यावर ! सत्यभामा-इतके दिवस तेथे राहयचं ? बलवंत-फार करून लवकरच येऊ. काम झालं की तेथे राहयचं कशाला ?. आपल्या सहवासाचं अमोल्य सुख सोडून तेथे उगीच राहण्याची हौस कोणाला आहे. सारख्या स्वभावाचा, सारख्या विचाराचा, सारख्या मनाचा असा हा जन्माचा प्रेमळ मित्र मिळाल्यावर, त्याचा समागम कोणाला नकोसा होईल. अनेक चांगल्या वाईट कल्पनांनी बहकून गेलेलं मन आणि तापलेलं डोकं, दोन गोड गोष्टी सांगून युक्तीनं ताळ्यावर आणून आणि या मृदु हाताने आपल्या मांडीवर घेऊन ते मग कोण बरं थोपटील. खरं मुख, खरी विश्रांति जगांत जर कोणाला मिळेल, तर त्याला त्याच्याच सारखं जेव्हां हैं जन्माचं विश्रांतिस्थान मिळेल, तेव्हांच मिळेल. एन्हवीं सर्व बाहेरची सुखं; एकाचं तोंड पूर्वेस आणि दुसऱ्याचं पश्चिमेस, असल्याने व्यर्थच, होत. आपल्याला तर या ठिकाणाशिवाय आणि या हातावर असं डोकं टेंकल्याशिवाय निवांत झोंप कधीच येत नाहीं; आणि ह्मणूनच आपण आतां येथें असेंच निजणार ! सत्यभामा-ही युक्ती मला कळली बरं! ( दोघे जातात.) प्रवेश तिसरा. स्थळ-नाना फडणवीसांचा वाडा. पात्र--नाना आणि कोंडाजी येतात. नाना-( आपल्याशी ) जी गोष्ट मोरोपंत आणि दाजीबा यांजकड़नच कळायला पाहिजे होती, ती मला या कोंडाजीकडून कळत आहे. ते दोघे श्रीमंतांच्या जवळ असून त्यांच्या जेव्हां ती लक्षात आली नाही, तेव्हां