पान:माधवनिधन.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. मराव्यांच्या इतिहासापैकी ज्या भागावर मी सध्यांचे नाटक लिहिलं आहे, त्याच भागावर एक दोन वर्षांपूर्वी विविधज्ञानविस्तारांतून एक नाटक ' सवाई माधवरावाचा मृत्यू ' या नावाचे एका विद्वान गृहस्थाने लिहून प्रसिद्ध केलें. माझ्या मनांतून याच विषयावर नाटक लिहावयाचे फार दिवसांपासून होते, पण दुस-या व्यवसायामुळे ते यावेळपर्यंत तसेंच राहिले. त्यांतून विविधज्ञानविस्तारांतून जेव्हां त्याच विषयावर एक नाटक प्रसिद्ध होऊ लागले, तेव्हां आपलेही दुसरे नाटक त्याच विषयावरच लागलेच सूरू करावे अशी मला त्यावेळी अवश्यकता वाटली नाही, ह्मणून ते काम तसेंच मागासले. विविधज्ञानविस्तारांतून प्रसिद्ध झालेले नाटक वांचून जे काय त्याजविषयी माझे मत झालें तें, आणि या विषयावर नाटक कसे लिहावे याबद्दलची माझी पूर्वीची कल्पना, या दोन्हीं मोष्टीला पुन्हां जागृति येऊन, त्या जागृतीचें हें सांप्रतचें नाटक फळ होय! - काल्पनिक नाटक अगर कादंबरी लिहिण्यापेक्षा ऐतिहासिक नाटक आणि कादंबरी लिहिणे जास्त अवघड आहे असे मला वाटते. ऐतिहासिक पुस्तकाची मर्यादा आंखलेली असते. नाटकाच्या अगर कादंबरीच्या संविधानकाकरितां इतिहासापैकी जो भाग घेतला असेल, त्या भागाच्या बाहेर ग्रंथकाराला मुळीच जातां येत नाही. त्या भागाच्या पूर्ततेकरिता त्याने जी काय थोडीबहुत त्यांत भर घालून आपली कारागिरी दाखवावयाची असेल ती दाखवावी. आपल्या कल्पनेला वाटेल तशा भराऱ्या मारूं देण्याला त्याला अधिकार नाही. त्यांतून इतिहासाला, किंवा ऐतिहासिक पात्रांना भलतेच स्वरूप देऊन सर्व गोष्टीला बाध येईल, व इतिहासाचे महत्व त्या योगानं कमी होईल असें त्याने करितां कामा नये. काल्पनिक ग्रंथाची मात्र गोष्ट तशी नाही. त्या ठिकाणी ग्रंथकाराला आपल्या कल्पनासृष्टीत स्वच्छंदपणे विहार करण्यास बरीच मोकळीक असते. अशी जरी गोष्ट आहे तरी ऐतिहासिक नाटक र