पान:माधवनिधन.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ बलवंत-भलताच प्रसंग आला तर तूं बायको माणूस काय करशील ? घरांत बसून नुसतं दुःख करशील हेच की नाही. सत्यभामा-बायको माणूस काय वाटेल तें करील. बलवंत-नाही पण काय करशील तें एकदा ऐकू दे तर खरं ! सत्यभामा-ऐकायचं काय; आणि सांगायचं काय ? प्रसंगी परमेश्वर बुद्धी देईल तसं करीन. समजा-सर्व दारं बंद केली, बाहेर पळून जीव बचावण्याला सवड नाही, आणि हातांत कांठी घेऊन आपला जीव घेण्याला काळाप्रमाणे मनुष्य तर तयार झाला आहे; अशा वेळेला लहान आणि गरीब मांजर सुद्धा आपल्या शत्रूच्या अंगावर, आपला जीव बचावण्याकरतां जाण्याला व त्याचं नरडे आपल्या दांतांनी काडकन् फोडण्याला आणि आप. ल्या रेशमासारख्या मऊ पंज्यांतून तीक्ष्ण नखं काढून त्याचं तोंड ओस्वाङज्याला मुळी सुद्धां मग भीत नाहीं; त्यांतलाच प्रकार, प्राणावरच आलं मगभीति कसली!! जी स्त्री आपल्या पतीबरोबर ऐश्वर्याचं आणि मोठेपणाचं सुख भोगण्याला तयार असते, तिनं त्याच्याबरोबर दारिद्याचं दुःखही भोगायाला तयार झालंच पाहिजे. जी एकाच गोष्टीला तयार असते ती खरी स्त्रीच नव्हे; आणि तिचं आपल्या पतीवर खरं प्रेमही नव्हे. आपल्याकरिता मी आपल्या जिवाकडे, फार तर काय पण माझ्या ह्या तान्हुल्याकडे सुद्धा पाहणार नाही, यापेक्षा मी आणखी जास्त काय सांगू! बलवंत- (आश्चर्याने ) हं; इतकी आपली तयारी आहे का ? सत्यभामा-आईबापांनी ज्यांच्या पदरी एकदां जन्माची गांठ बांधून दिली, त्यांच्याकरितां सर्व काही करायला आमाला नेहमी तयार असलंच पाहिजे. त्यांचं भलं ते आपलं भलं, त्यांचं वाईट तें आपलं वाईट, त्यांचा जीव तोच आपला जीव, मग त्या जिवाची जी वाट, तीच या जिवाची वाट लागायला नको का? बलवंत-तुझा निश्चयी स्वभाव मला पूर्वीपासून माहीत आहे. तुझ्या मनांत में एकहां येईल ते केल्याशिवाय तूं कधीं राहवयाची नाहीस. बरं