पान:माधवनिधन.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९] माधवनिधन. गानं कांहीं एक पुरषार्थ व्हावयाचा नाही. एकदां ही नांव समुद्रांत लोटली श्वरी, काय होईल ते होईल. एक ही तड किंवा ती तड. बलवंत-मला भिती वाटतें ह्मणून मी असें ह्मणतों असें मुळीच नाही. आजपर्यंतचं काम निराळं, आणि आतां में बाजीरावानं काम सांगितलं आहे तें निराळं आहे ह्मणून ह्मणतो. दुसरं काही नाही. सत्यभामा-कोणचं बरं तें ? बलवंत-कोणचं ह्मणजे, तुला काल सांगितलं तें ! अगं त्यांनी एक जिन्नस श्रीमंतांस देण्याकरितां दिली आहे! सत्यभामा-अं! त्यांत काय अवघड आहे. आजपर्यंत आपण जसं पत्र देत होता, तशी आतां या खेपेला जिन्नस द्यायची. पत्र देण्याइतकंच ते सोपं आहे. आणि त्याबद्दल कां आपल्याला इतकं अवघड वाटतं, इतका संशय येतो. धन्य झालीहो बाई आपल्या स्वभावापुढे. कांहीं करा, ज्याचा जो मूळचा स्वभाव आहे तो कधीही बदलला जात नाही. आणि कदाचित् कांहीं कारणानं बदलला तरी तो आपलं मूळ कधी सोडीत नाहीं; केव्हां तरी पहिल्या ठिकाणावर यायचाच, हे जे मंणतात तें कांहीं खोटं नाही. हे पहा, त्याबद्दल आपल्याला काही एवढं अवघड वाटायला नको आणि एवढा संशयही यायला नको. बलवंत-कदाचित् कोणाला कळलं, कोणी पाहिलं तर; आणि भलताच प्रसंग आला तर, रावाचा रंक व्हावयाला काही वेळ लागायचा नाहीं; मणून ह्मणतो. सत्यभामा–ही जशी आपल्या मनांत कल्पना आली, तशी रंकाचा राव होण्याची कां बरं आपल्या मनांत कल्पना आली नाही. यामुळे बाजीरावाचे आणि श्रीमंत पंतप्रधानाचे आपण जिव्हाळ्याचे मित्र आणि सल्लागार बनून, हलके हलके नानाच्या बरोबरीला नाहीं कां कधी जाऊन बसणार ? आणि असं झालं ह्मणने रावाचा रंक आणि रंकाचा राव होण्याला मुळीच वेळ लागणार नाहीं; त्या गोष्टी मणजे आतांच होतील असे काही नाही. कसाही प्रसंग आला तरी त्या प्रसंगी कसं वागावं हे मला चांगलं माहित आहे.