पान:माधवनिधन.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ प्रवेश दुसरा. स्थळ-बलवंतराव नागनाथाचा दिवाणखाना. पात्रे-बलवंतराव आणि त्यांची स्त्री सत्यभामा. सत्यभामा-पहा, मी सांगितल्याप्रमाणे करायचं झालं ह्मणून किती काम झालं. श्रीमंत पंतप्रधान माधवरावसाहेबांची आणि आपली आतां पूर्वीपेक्षा किती जास्त ओळख झाली. बाजीराव साहेबांबरोबर आपल्यामार्फतीनं, त्यांचा जो पत्रव्यवहार आज दीड दोन महिने सुरू आहे, त्या प्रत्येक पत्रांत त्यांनी आपल्याला किती गौरवून लिहीलं आहे. आपल्याला मी विसरणार नाही ह्मणून कितीकदां वचनं दिली आहेत. ही सर्व यावेळी दिलेली वचनं फुकट जातील असं आपल्याला वाटतं का ? या ओळखीचा पुढे पाठीमागें श्रीमंत माधवराव पेशवे स्वतां सर्व कारभार पाहूं लागले झणजे कांहींच उपयोग होणार नाही अशी आपली अजून समजूत आहेना ! शर्थ झाली बाई संशयी स्वभावाची हो ! - बलवंत-आता ह्मणजे श्रीमंत मला विसरतील असं मला स्वप्नांत सुद्धां वाटत नाही; पण कधी राहून राहून असं वाटतं की, श्रीमंतांमध्ये आणि बाजीरावसाहेबामध्ये सध्यां जो पत्रव्यवहार माझ्या मार्फतीने चालत आहे, हा जर नानांना कळला आणि भलता प्रसंग आला तर मग कसं! सत्यभामा-तर मग कसं काय ? हा असला आपला भितरा आणि संशयी स्वभावच आपल्याला बाधक होईल, ए-हवी कांहीं देखील व्हावयाचं नाहीं हे मी पक्कं सांगते. संशयच मेला जिथं तिथं बाधतो. संशयभुतानं ज्याला एकदां पछाडलं, त्याच्या हातून कसलंही साहसाचं काम होत नाही. तो केव्हांतरी आपल्या संशयानंच फसायचा. तेव्हां हा असला मेला घातक सं. शय द्यावा गडे टाकून ! नांव पलिकडच्या कांठाला पोहचेल की मध्येच बुडेल, अशा रितीनं नांव हांकणारा नावाडी अफाट दर्यात नांव हांकण्यास अ. गदी उपयोगी नाही. प्रपंचांत बरें आणि वाईट असे प्रसंग पुष्कळ येतात. त्याला भिऊन स्वस्थ एकाजागी माशा मारीत बसणं हे बरं कां? अशा यो