पान:माधवनिधन.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्ष ७ ४२ कादंबरसिंग्रह पुस्तकमाला. शत्रुला दंड करायला अंगांत सामर्थ्य नसलं, साम दामाच्या गोष्टींचा उपयोग होईनासा झाला ह्मणजे मग भेद केल्याशिवाय गत्यंतर नसतं. आज वीस दिवस झाले, वैजनाथभटजीसारख्या कडकडीत ब्राह्मणाने केलेले अनुष्ठान कधीच निष्फळ व्हावयाचं नाही, अशी माझी मनदेवता मला सांगते. भटनी मला एक निधानच सांपडलं आहे यांत बिलकूल शंका नाही. ( त्याच्याकडे पाहून ) त्यांनी आतां डोळे उघडले आणि गोमुखी खाली ठेविली, त्यावरून त्यांचा जप पुरा झाला असे वाटते. आतां ते माझ्याशी बोलतील. (वैजनाथभट तसे करतो, बाजीराव त्यास पुन्हां उठून नमस्कार करतो.) वैजनाथ-~-[ हाताने बसण्यास सांगून, पुन्हां धूप कापूर वगैरे जाळून फुलें वगैरे वाहतो, व ताईत मंतरतो ] स्वारी आतांच आली वाटतं. बाजीराव-हो, झाली सुमारे अर्धघटका मला येऊन ? वैजनाथ-आजचा अनुष्ठानाचा शेवटचा दिवस आहे, समाप्तीही व्हावयाची आहे, त्यावेळी यजमानांनी सांनिध्य असलं पाहिजे ह्मणून श्रीमंतांना इतक्या रात्री येण्याचे श्रम देणं भाग पडलं. बाजीराव-~त्यांत श्रम कसले! काही नाही. सर्व सिद्ध झालंना ? वैजनाथ-त्याची तर मुळीच शंका नको ! आमच्या गुरूची कृपाच तशी आहे. हाती घेतलेल्या कामांत अपयश ह्मणून कधी यायचे नाही. बाजीराव-आपण जसे योग्य, तसे आपले गुरुही योग्यच असले पाहिजेत; त्या मोठ्याच विभूती ! यांत काय संशय ! - वैजनाथ-( ताईत आणि फुलें बाजीरावाच्या हाती देतो.) हा ताईत श्रीमंतांच्या जवळ असला किंवा त्यांनी याला हात लावला ह्मणजे आपलं काम झालं ह्मणून समजावं. एवढं काम झाल्यानंतर त्याचा प्रत्ययही आपल्याला हळू हळू यायला लागेल. P. बाजीराव-प्रत्यय आला ह्मणजे झालं! त्याने नेहमी माझं ह्मणणं ऐ. कावं, मी नेहमी जवळ असावं असं त्याला वाटावं, रात्रंदिवस त्याला माझा निदिध्यास लागावा, याशिवाय मला दुसरं कांहीं एक नको. वैजनाथ --श्रीमंतांची जशी इच्छा आहे त्याचप्रमाणे सर्व होईल. नेहमी