पान:माधवनिधन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९] माधवनिधन. तर्क याचे सिद्धांत; संहिता ब्राह्मण, क्रम, जटा वगैरे गोष्टींचा काथ्याकूट खुशाल करीत बसा; त्यापासून तत्वार्थ ह्मणाल तर नुसत्या कंठशोषाखेरीज कांहीं एक नाही. कोणी कसलाही पाखांडी आणि वेदांती असला; कोणी स्त्री कितीही धार्मिक असली तरी पुरूष ज्योतिषाच्या, आणि बायको जादुटोणाच्या फासांत सांपडल्याशिवाय राहत नाहीच. कारण प्रत्येकाला आपलं पुढचं चांगलं समजून घेण्याची अत्यंत इच्छा असते. आमचे बाजीरावसाहेब तर दोन्हींच्याही फासांत सांपडले आहेत ! आतां त्यांना मी वाटेल तेव्हां आणि तेथे जरी यायला सांगितलं तरी ते येतील. आज प्रयोगसिद्ध व्हावयाचा आहे. आपण तेथे हजर असलं पाहिजे; ह्मणून मी त्यांना सांगितलं होतं, तेव्हां ते आतां येथे आल्याशिवाय कधी राहणार नाहीत. (पाहून ) हो, तो कंदील इकडे येतो आहे, त्यावरून त्यांचीच स्वारी येत असावी. धूपबीप जाळून बहुतेक तयारी करून ठेवावी, आणि आपण काही वेळ मौनव्रत धरावं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर मी त्यांना येण्यास सांगितलं होतं. (वैजनाथभट निखायावर धूप जाळतो, कापूर लावतो, फुले वाहतो, पुन्हां गोमुखीत हात घालून मौनव्रत धरून गोमुखी वारंवार वाजवीत, डोळे मिटून जप करीत बसतों, इतक्यांत बाजीराव येतो, व त्याला नमस्कार करून बसतो.) बाजीराव-( आपल्याशी) मला भटजींनी सांगितलेल्या वेळेलाच मी आलो. जर एवढा हा माझा माधवरावाला वशिकरणाचा प्रयोग सिद्ध झाला, आणि माधवराव माझ्या ताब्यांत आला, मी सांगेन तें तो करूं लागला, ह्मणजे मग त्या थेरड्या नाना फडणविसाची खोड मोडण्याला किती अवकाश? त्याने, त्यानेच आमच्या दादांना आणि आईला नानात-हेची कारस्थानें करून मरेपर्यंत कैदेत ठेवून छळले, आणि आम्हां त्यांच्या मुलांना सुद्धा तो आज वीस वर्षे सारखा दुष्ट ग्रहाप्रमाणे अजून छळतो आहे, आणखी पुढे किती वर्षे छळणार कोण जाणे! सर्व ग्रहांत महा तामसी, देवादिकांनासुद्धा त्राहि त्राहि करून सोडणारा आणि सर्व जगाला पीडा देणारा शनी ग्रह कोणालाही साडे सात वर्षांवर पीडा देत नाही, पण हा, रघुनाथराव दादासाहेबांच्या वंशाची पाठ नाना फडणविसं, महाग्रह जन्मोजन्म सोडीत नाही !!