पान:माधवनिधन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[वर्ष ७ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. अंक तिसरा. प्रवेश पहिला. 1. स्थळ-शिवनेरी किल्ल्यांतील शिवाई देवीचे देऊळ. पात्रे-जटा वाढलेला, कपाळी कुंकवाचा पट्टा फासलेला, पुढे देवीच्या पुजेचें सामान मांडलेले आहे आणि आसनावर गोमुखीत हात घालून जप करीत असा वैजनाथभट पर बसला आहे. वैजनाथभट--(आपल्याशी) मी घरांतून भिक्षुकीच्या उद्देशानं निघल्यासारखं यंदा मला भिक्षुकी चांगली मिळाली ह्मणायची ! श्रीमंत माधवराव पेशव्याचं, बाजीराव आणि बलवंतराव नागनाथ यांच्या वगीनं दर्शन होऊन, श्रावणमासच्या रमण्यांतही आमची संभावना चांगली झाली, आणि बाजी रावाची व चिमणाजी आप्पाची श्रीमंतासमोर स्तुती केल्यामुळे थोडीशी ओळखही पडली असें ह्मणायला हरकत नाही. त्यापेक्षा हे बाजीरावाचं संधान तर फारच नामी हाती लागलं. ज्योतिष आणि मंत्रतंत्र, त्यांत वशिकरणाही वगैरे प्रयोग येत आहेत, असं सांगितल्यामुळे तो तर अगदी माझ्या भजनींच लागल्यासारखा झाला आहे. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे; तो मला आतां या जन्मांत कधीच विसरणार नाही ही माझी पूर्ण खात्री आहे. तो माझ्या नादी लागल्यामुळे मला त्याच्यापासून आजपर्यंत प्राप्तीही बरीच झाली. हे प्रयोग सिद्ध करण्याचं अनुष्ठान संपल्यानंतर मेहनतीबद्दल रोजच्या दोन मोहरा, याप्रमाणे वीस दिवसांच्या चाळीस मोहरा मिळण्याला काही एक हरकत नाहीं; त्याशिवाय बोवाची विदागी होईल ती निराळीच ! इतकं सर्व मला थोडसं ज्योतिष, थोडासा जादूतोणा, थोडासा वेद, थोडीशी वैद्यक्रिया वौरे सर्व गोष्टी थोडथोड्या येतात ह्मणून ! नाहीतर नुसता वैदिक, नैयायिक, अथवा मोठा वैय्याकरणी झालो असतो तर कांहीं एक उपयोग झाला नसता. ही घबाडे त्यांनी काही हाती आली नसती. पाहिजे तर सभेत बसून समोरच्याशी पाणिनी, पातंजली यांची सूत्रं; न्याय,