पान:माधवनिधन.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९] माधवनिधन. फार अधिक आहे. त्या तहनाम्यानं कांही माझ्या आनंद समुद्राला भरती आली नाही, पण याच्यामुळे तर तो अगदी उचंबळून सोडला आहे; आणि जितक्या वेळ मी हे पत्र वाचतो, तितक्या वेळ तो जसा उचंबळून सोडतो; तसं त्या तहनाम्यानं काही होत नाही. या पत्राने व या चिमुकल्या हाताने लिहिलेल्या सुंदर पुस्तीने, माझ्या मनांत आजपर्यंत जे नव्हते तें आप्तस्वकीयासंबंधाचें प्रेम उत्पन्न करून दिले. अ.पठा कोणी आप्तस्वकीय, मग तो कितीही लांब असो, त्याला आपण आजन्मांत कधी पाहिलं असो अगर नसो, पण त्याच्या संबंधानं आपण कधी काळी बरं वाईट ऐकलं, तर त्या. च्याबद्दल आनंदाचा अगर दुःखाचा उमाळा तात्काळ फुटणं; याला कारण स्वकीयासंबंधाचं आंधळं प्रेम, याशिवाय दुसरं काय आहे ! त्या प्रेमाला ह्मणने अमुकच कारण पाहिजे असं काही नाही. बाबासाहेबांनी जरी मला कधींही पाहिलं नाही, तरी त्यांच्या मनांत मजबद्दल किती प्रेम आहे. ते मला किती तरी चाहतात ! खरोखरच ते फार प्रेमळ असले पाहिजेत. आपल्याच माणसांना आपल्याबद्दल जितका आनंद आणि दुःख होईल, तितका दुसऱ्याला होत नाही. शरीराच्या सर्व अवयवांचा जरी परस्पराशी कांही एक संबंध नाही, तरी त्याच्यापैकी कोणत्याही अवयवांला अगर शरीराच्या कोणत्याही भागाला एवढीशी इजा झाली ह्मणजे जसा जीव तात्काळ कासावीस होतो, त्याला जसा मग डावा उजवा हा भेदाभेद माहित नसतो; त्याचममाणे एकाच वंशांत उत्पन्न झालेल्याच्या आप्तस्वकीयांच्या प्रेमाची गोष्ट आहे. या पत्राने त्यांची माझी आज प्रत्यक्ष भेट करून दिली असं मला वाटत आहे. मी त्यांचा पत्राने समाचार घेतल्यामुळे आज कशी मला सुखाची झोप येईल! आतां नेहमी त्यांच्याशी पत्रव्यवहार ठेवायचा हाच (जातो.) निश्चय ! अंक दुसरा समाप्त.