पान:माधवनिधन.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ लहानसा हत्ती मी मागविला आहे, ते आले ह्मणने पाठवून देईन, असे सांगा. विसरू नका. बलवंत-मुळीच विसरणार नाही. ( उठतो ) घेतों आज्ञा! माधव-हो, भटजीबद्दल मी तजवीज केली आहे, आणि त्यांनी तुमच्याबद्दल जे लिहिलं आहे, ते माझ्या पूर्णपणे लक्षात राहील. वेळ आली ह्मणजे मी तुमाला विसरणार नाही. सध्या माझी खूण ह्मणून ही तुमच्या जवळ असू द्या. [ त्याला बोटांतली आंगठी काढून देतो.] बलवंत-[ ती मोठ्या आदराने घेऊन, आनंदयुक्त मुद्रेनें ] याही दासावर कृपा असावी, याशिवाय श्रीमंतांच्या चरणानवळ कांहीएक मागगं नाही. [ नमस्कार करून जातां जातां आपल्याशी, ] येतांना जे मला शुभ शकून झाले, त्याचं फल तर तात्काळ मिळालं ! थोडसं धैर्य धरल्याशिवाय, थोडसं साहस केल्याशिवाय आणि थोडा दृढ निश्चय केल्याशिवाय कोणचंही काम होत नाही, व कोणचाही मनुष्य पुढे येत नाही, हे तिचं ह्मणणं अगदी बरोबर आहे. या वेळपर्यंत कसं होईल काय होईल, नानच्या अगर दुसऱ्या कोणाच्या दृष्टोप्तत्तीस हे माझं करण येतं की काय ? श्रीमंतांस हे आवडेल की नाहीं; या शेकडो कल्पनांनी माझ्या मनाचा अगदी गोंधळ करून सोडला होता. श्रीमंतांकडून उत्तेजन मिळत चालल्यामुळे मला आतां श्रीमंत बाजीरावसाहेब पेशव्याचें काम, हरत-हेने करण्यास जास्तच हिंमत आली आहे. आणि त्यामुळे माझ्या भावी उदयाची व ऐश्वर्याची प्रचंड आणि सुंदर इमारत आतां माझ्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी असलेली दिसत आहे. जरा सावधगिरीने काम केलं पाहिजे. या कामाचा आरंभ जसा गोड झाला तसा त्याचा शेवटही गोड होवो झणजे झालं. ( जातो.) __ माधव- ( आनंदाने ) अहाहा, खाच्या लढाईत निजामाची चांगली खोड मोडून चाळीस लक्षांचा मुलुख पेशव्यांना मिळाल्यामुळे महाराष्ट्रांतील सर्व आबालवृद्धांना जेवढा आनंद झाला असेल, त्या सर्वांच्या आनंदापेक्षा, शतपटीने जास्त आनंद, आज मला बाबासाहेबांचे हे पत्र आल्यामुळे होत आहे. निजामानं लिहून दिलेल्या तहनाम्यापेक्षा या पत्राची किंमत फार