पान:माधवनिधन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९). माधवनिधन. च असतात. त्यांना दुसरे लोक आणि दुसऱ्याचे गुण कितीही लहान असले, तरी ते मोठेच वाटतात. बाबासाहेब, पत्रांतून वारंवार जितकें आपण माझं वर्णन करतां, तितका खरोखरच मी नाही. ( थोडे थांबून ) बरं, त्यांचं मला जसं पत्र आलं आहे तसंच, त्यांच्याच पत्राच्या तोंडीचं माझंही पत्र त्यांना गेलं पाहिजे. पाहूं बरं तें तसं लिहिलं गेलं आहे की नाही ! [ पत्र घेऊन एन्हां वाचतो. ] पाहिलं, आप्पासाहेबांना त्यांच्या पुस्तीबद्दल, आणि आशिर्वादाबद्दल लिहायला मी अगदी विसरलो. आतां तें ताजाकलम घालून लिहावं, किंवा त्यांना निराळीच चिट्ठी लिहावी ? ( विचार केल्यासारखे करून ) बाबासाहेबाचं पत्र पुरं केलं आहे, तेव्हां आतां त्यांना ताजाकलम घालून लिहिणं बरं नव्हे ! त्यावरून मला त्यांची आठवण प्रथम झाली नाही, असेही दिसणार; तेव्हां तसं नको. त्यांना निराळीच चिठ्ठी लिहावी हेच बरें ! ( रुमाल सोडून चिट्ठी लिहितो.) [ चिट्ठी संपवून लखोटा बंद करतो. 7 आतां ठीक झालं. [इतक्यांत बलवंतराव नागनाथ येतो व श्रीमंतास नमस्कार करतो. ] या पागेदारसाहेब या, बसा. झाली कां तयारी ? बलवंतराव-( हात जोडून ) बरोबरच्या मंडळीस तयार होण्यास सांगून, मी हा तयार होऊन श्रीमंतांच्या हुकुमाप्रमाणे श्रीमंतांची आज्ञा घेण्याकरितां इकडे आलो. श्रीमंतांची आज्ञा घेतली की, तसाच परभारें शिवनेनेरीस रवाना होणार. आतां निघालों ह्मणजे सकाळपर्यंत सहज जाउन पोहचेन. माधव-ही पहा आमच्याकडूनही तयारी आहे. (लखोटा त्याच्या जवळ देतो. ) मला जे काय लिहावयाचं होतं, ते मी सर्व पत्रांत लिहिलंच आहे. फक्त बाबासाहेबांस माझा शिरसाष्टांग नमस्कार सांगून माझा असा निरोप कळवा की, “ आमची कृपा काय असावयाची आहे, वडिलांचा आमाला आशिर्वाद असावा ह्मणजे झालं.” आप्पासाहेबांना माझा आशिर्वाद कळवा, आणि त्यांना ही माझी लहानपणची हिन्याच्या मुठीची तरवार मी नजर देत आहे ती द्या; आणि त्यांना असंही कळवा की, त्यांच्याकरितां हिंदुस्थानांतून एक लहानशा सुंदर सारंग्या बटाची जोडी व नेपा तन एक ळां ५०