पान:माधवनिधन.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ [वर्ष . कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. प्रवेश ५ वा. स्थळ-श्रीमंत सवाई माधवरावाचा महाल. पात्रे-श्रीमंत सवाई माधवरावपेशवे बसले आहेत. माधव-(पत्र लिहून पुरे करतो आणि पेटीतून बाजीरावाचे पत्र काढून वाचतो.) काय लिहितात बाबासाहेब आजच्या या--पत्रांत "विशेष. ज्या आपल्या प्रतापवंत पूर्वजांच्या गादीवर आपण बसला आहांत त्या गादीला शोभा आणणाऱ्या, तिचा प्रभाव जास्त वाढविणाऱ्या आणि आपल्या शौर्यशाली पूर्वजांच्या वंशजाना शोभणाऱ्या, अशा अनेक गुणगणांनी आपण मंडीत आहात. आपले सद्गुण सर्व आबालवृद्धांच्या तोंडून ऐकून आमाला जो आनंद होत आहे, तो पत्री लेखन करण्यास आम्ही अगदी असमर्थ आहोत. आपले गुणानुवाद आणि आपण नुकताच आपल्या प्रवल शत्रूवर मिळविलेला जय ऐकून, आपले प्रत्यक्ष दर्शन घेऊन आम्ही केव्हां आपणाला कृतार्थ मानूं व या उत्सुक झालेल्या आमच्या नयनचकोरांची तृप्तता करून घेऊं, असें आह्माला झालं आहे. तो प्रत्यक्ष दर्शनाचा सुदीन जेव्हां कधीं उगवेल तो उगवो; सध्या तर तसे होण्याची उभयतांसही आशा नाहींच, पण मनोमन साक्षीने आणि पत्रोत्तराने भेट घेण्यास कांहीं हरकत श्रीमंताकडून तरी असेल असे वाटत नाही. आपली मने जर एक आहेत, तर त्याला दुसऱ्याच्या प्रतिबंधाने काही व्हावयाचे नाही. आपल्या उभयतांच्या जन्मांतरीच्या झालेल्या गोष्टी मनांत ठेवू नयेत. त्याबद्दल मला किती वाईट वाटते हे पत्री लिहिता येत नाही. त्याचा माझ्याकडे काय अपराध की, त्यामुळे मी आपला, असें होण्यास अगदी अपात्र व्हावे. असो, आमच्यावर कृपादृष्टी असावी, वरचेवर कुशल यांच्याबरोबर कळवीत जाणे, हीच विनंती आहे." हे मला किती गौरवानं लिहिलं आहे. मला किती मोठेपणा दिला आहे. माझ किती गुण गायले आहेत. बाबासाहेब माझ्या मनांत त्याबद्दल कांहीं एक नाही. बरोबरच आहे, मोठ्यांचे अंतःकरण आणि दृष्टी ही दोन्ही मोठी