पान:माधवनिधन.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९ माधवनिधन. प्रदेश ४ था. स्थळ-श्रीमंत सवाईमाधवरावाच्या महालाबाहेरचं दालन. पात्रं-कोंडाजी दालनांतील बैठक घालीत आहे. कोंडाजी-( आपल्याशी ) मी कालपून बघतुया, त्यो शिवनेरी किल्यावरचा पागंदार बामन, आन त्येचा बरोबरीनं त्यो दुसरा बामन शिरीमंता. कडे जात्याती, येत्याती, येत्याती जात्याती, आंत बाहिर, असं त्यांनी कालपून धा वखत केलं असंल. शिरीमंताजवल जाऊनशानी वढाळ बसत्यात; गुलगुल गोष्टी करत्यात, तवा इचिभन् ह्ये आहे तरी काय कारीस्थान; येचा तपास काढला पाहिजे. आतां जवा जवा यो बामन शिरीमंताजवल येत जाईल, तवा तवा काई बी काम काढून मला हातच काम करीत राह्यलं पाहिजे, त्याबगर हे लचांड काय आहे त्ये उमगायचं नाही. हातानं काम करून कान आन् डोळं समदं मला तकडच लावलं पाहिजे. हे समदं हेरूनशानी त्येची खबार द्यावी नानासाहिबासनी; ह्मणजे कवा न कवा तरी आपलं उखाळ पांढरं होईल. त्यासनी ह्ये समदं हेरून सांगितलं ह्मणजे त्ये माझी पाठ थोपाटत्याल, मला मोठा इमानदार मनत्याल, मला बक्षिस देत्याल, आन मला दुसरं काम बी देत्याल. मला दुसरं काम मिळालं मनजे मग मी कोंड्या कामाटी न्हाई राहनार. कोंडाजीराव बनून जाईन. मग बघु, बघु तर खरं ती फटान्यावानी आक्सी उडनारी मैना मला कशी क्यार पोत्यारं करनारा कोंड्या कामाटी म्हनते ती! ह्यो कोंडाजी त्या मैनेकरितां काय वाटल त्ये करील; जासूद होईल, हुजऱ्या होईल, वाटंल त्यो होईल; पन त्या माझ्या अस्तुरीला हातची जाऊं देनार नाही, आन् तिच्याशी पाट लावल्याबगर कधीं बी राहनार न्हाही. इचभन् ती हय बी लई फटाकडी, आन टपटपा उडती बी लई. आक्सी मुरक्यातच. पन ह्ये समदं काम युक्तीनं केलं पाहिजे; आन् आपला कावा कुनासनी कलून देऊन उपयोगी नाही. त्यो त्यो पहा, त्यो कालचा पागेदार शिरीमंताजवळ पुन्हा बिगी बिगी चालला हाय. तिथं मुर्दाडावानी काम करत राहून समदं हेरलं पाहिजे. ( जातो. )