पान:माधवनिधन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ माधव-बरं तर मला पुन्हां उद्यां संध्याकाळी जाण्याचे आधीं येऊन भेटा, ह्मणजे मग तुझाला जे काय मला सांगायचे असेल तें सांगेन; आणि यांच्याबद्दलही काय करायचं तें करीन. बलवंत-श्रीमंतांच्या आज्ञेप्रमाणे करीन. हैं-सर्व-गुप्त रितीनं-व्हावंअशी त्यांची इच्छा आहे. माधव-बाबासाहेबांच्या ह्मणण्याप्रमाणे सर्व होईल. (ते दोघे नमस्कार करून जातात.) (आपल्याशी) दादासाहेबांच्या आणि आजीबाईच्या कारस्थानामुळे माझे बाबा, गारद्यांच्या हातून मृत्यू पावले, असे सगळे लोक ह्मणतात आणि तेवढ्या करितां त्यांचे नांव निघाले की, अद्यापपर्यंत सर्व जण तिरस्काराने नाक मुरडतात, व मी देखील आजपर्यंत तसेंच करीत होतो. पण बाबासाहेबांनी एका पत्रांत या सर्व गोष्टींचा खुलासा करून टाकल्यामुळे, बाबासाहेबाबद्दल मला जो प्रथम राग येत असे, तो विनाकारण होता अशी माझी खात्री झाली. ज्या गोष्टी माझ्या व बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी झाल्या, त्या गोष्टीबद्दल आमी परस्परांनी परस्पराशी द्वेष करावा आणि तो देखील पूर्वीच्या ऐकीव गोष्टीवर, हे किती अनुचित् . त्यांतून बाबासाहेबांसारख्या प्रेमळ मनुष्याचा द्वेष विनाकारण करणे हे तर फार अयोग्य. त्यांच्या मनाला देखील याबद्दल फारच वाईट वाटत असेल त्यांच्याशिवाय माझे जवळचे आप्त दुसरे कोण आहेत. ती गोष्ट त्या हरामखोर गारद्यांनी केली, की आजोबा आजीबाईकडून झाली, हे खरे काहीच कळत नाही. बाबासाहेबांसारखे प्रेमळ मनुष्य सांपडणे कठीण आहे ! हेच पहाना, त्यांनी मला किती गौरवून लिहीलं आहे, तेच ते पत्र एकदां दोनदां वांचून माझी तृप्ती होत नाही, शंभरदां वाचावेसे वाटते. ( पत्र पुन्हां काढतो व पुन्हां ठेवतो) रात्री निजण्याचे वेळी एकांती वाचूं. ' सध्या मंडळी येण्याची गडबड आहे, तेव्हां आतां काढूं नये व वाचूं नये हेच बरे. (पेटीत बंद करतो. ) जातो.