पान:माधवनिधन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगष्ट १८९९] माधवनिधन. ३३ - बलवंत-याचं उत्तर -श्रीमंतांनी दिल्यास मी ते घेऊन जाईन. श्रीमंताजवळ मी बाबासाहेबांचे व आप्पासाहेबांचे किती गुण वर्णन करावे ? जितके करावे तितके थोडेच आहेत. घोड्यावर बसण्यांत, भाला फेंकण्यांत, तीरंदाजी करण्यांत, बोलण्यांत, रूपांत वगैरे सर्व गोष्टींत ते प्रती थोरले रावसाहेब बाजीरावसाहेबच आहेत. पाहिजे असेल तर या भटजीसच विचारावं. माधव-[ त्यांच्याकडे पहातो व त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो. ] असं काय ? . वैजनाथ --बाबासाहेबांची इभ्रत केवढी, रुबाब कसला. शिवाय ते ब्रह्मकर्मांत, शास्त्रांत, वेदांतांतही तसेंच निपूण आहेत. ते बह्मकर्मात आणि क्षात्रकर्मांत निपूण असल्यानं मला वाटतं की, सांप्रतकाळी ते परशुरामच आहेत. धाकटे आप्पासाहेब तरी लहान वय असून श्रीमंताचे आजे जे आप्पासाहेब, मागे होऊन गेले तेच आहेत. त्या उभयतां बंधूंच्या अप्रतीम गुणावरून श्रीमंत थोरले रावसाहेब जे बाजीरावसाहेब व आप्पासाहेब यांची, त्यांच्या पूर्वजन्मी क्षात्रधर्माबद्दलची हौस पुरी झाली नाही, ह्मणून पुन्हां ते अवतीर्ण झाले आहेत, असे सर्व लोक ह्मणतात. माधव-( आनंदीत मुद्रेनें ) पेशव्यांच्या कुलांतील पुढच्या पुरुषांचं, आपल्या मागील पूर्वजांचा कित्ता वळवून त्यांच्याप्रमाणेच व्हावयाचं, असं व्रतच आहे. बरं पण पागेदार, हे भटजी कोण ? - बलवंत हे भटजी, विजयदुर्गाकडचे श्रीमंतांचे श्वशर जे गोखले त्यांच्याकडून आले आहेत, शिवनेरीस होते. मोठे ज्योतीषी असून विद्वान् आहेत. श्रावणमास आला आहे, पुण्यास जाण्याबद्दल व श्रीमंतांचं दर्शन व्हावं ह्मणून बाबासाहेबापाशी त्यांनी विनंति केली, तेव्हां त्यांच्या आज्ञेवरून मी त्यांस येतांना श्रीमंतांच्या दर्शनाकरितां बरोबर घेऊन आलो. माधव-ठीक आहे. बलवंतराव तुह्मी परत जाणार केव्हां ? बलवंत- मी उद्या संध्याकाळी जाण्याचा बेत केला आहे.