पान:माधवनिधन.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ वढ्या करितांच मला कचेरीत लवकर जायचं आहे, तेव्हां मला आज्ञा असावी. नाना माझी वाट पहात असतील. (इतक्यांत हुजऱ्या येऊन बलवंतराव नागनाथ आल्याची वर्दी देतो.) माधव-तुमची हजिरी झाली झणजे मग एक आंकडा मला कळवा. बाबूराव-लवकरच कळवितों. माधव--घरीं जातांना इकडे येऊन मला भेटून जा. बाबूराव-आज्ञा. ( तो जातो; व बलवंतराव नागनाथ आणि वैजनाथभट्ट येतात व नमः स्कार करून बसतात.) माधव-कां पागेदार, केव्हां आलांत शिवनेरीहून ? बलवंत-सरकार, काल आलो. सरकारी काम होतं तें आज उरकून घेतलं, आणि झटलं दोन तीन महिने झाले सरकार चरणाचं दर्शन घ्यावं आणि मग परत जावं, अशा इराद्यानं दर्शनाला आलो. माधव-कशी काय तिकडील खबरबात ? आमचे बाबासाहेब, आप्पासाहेब, सर्व कुशल आहेत ना ? बलवंत-हो, सर्व कुशल आहेत; आणि त्यांनी हे श्रीमंतांस गुप्त रितीनं देण्याकरितां ( इकडे तिकडे पाहून लखोटा काढून त्यांच्या हाती देतो) दिलं आहे, व “ आमच्यावर कृपा असावी” अशी त्यांनी श्रीमंताजवळ माधव-बोला, बोला, काही हरकत नाही. ( लखोटा घेतो.) बलवंत-हे सर्व गुप्त रितीनं व्हावं, आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही कळं नये, अशी त्यांची इच्छा आहे. माधव-असे काय ? बाबासाहेबांच्या मर्जीप्रमाणेच सर्व होईल. काय ह्मणतात बाबासाहेब ! बलवंत-त्यांचं दुसरं-कांहीं-ह्मणणं नाही. फक्त " श्रीमंताची आमच्यावर कृपा असावी, व कुशल वर्तमान वरचेवर कळवीत जावं," अशी त्यांची श्रीमंताजवळ विनंती आहे. माधव-(हांसून ) काय ? बाबासाहेब मला विनंती करतात !