पान:माधवनिधन.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८] माधवनिधन. पाहिजे होती, तशी काही बोवा झाली नाही. आपल्या पटवर्धन वीरापैकी विठ्ठलराव मात्र अमोल हिरा या लढाईत हारपला. त्याला दोन तीन जखमा किती जबर लागल्या होत्या, त्या तूं पाहिल्याच होत्या. अरे, तो अर्धा शुद्धीत, अर्धा गैरशुद्धीत होता तरी जेव्हां थोडासा सावध होई, त्यावेळी सुद्धां ' मारा, झोडा, पुढे सरा, मी कुठे आहे, माझे लोक कुठे आहेत,' असेंच बडबडत होता. लढाईचे त्याला कोण स्फुरण चढलं होतं. खरा शूराचा बच्चा तो यांत काही शंका नाही. खऱ्या वीराला योग्य असेंच त्याला धारातीर्थी मरण आलं. त्याच्या मृत्यूमुळे भाऊंना फार दुःख झालं आहे. मरण यावें तर तें असेंच धारातीर्थी यावं. नाही तर घरांत आंथरूणावर पडून, सहा सहा महिने कुजत पडलेच आहेत; असलं मरणं ह्मणने तें कुत्रयाचं मरणं! तो जर जगता तर खरोखर एक अप्रतिम नांव घेण्याजोगा वीर झाला असता. बाबूराव--यांत काय संशय ! पटवर्धन मंडळीतला तो एक मोहरा होता. शिवाय स्वभावानं किती चांगला, किती मनमिळाऊ, किती बोलका आणि केवढा धाडसी ! ज्या त्या कामांत आपण पुढे व्हावयाची त्याला फार हौस होती. माधव-( उसासा टाकून.) जेव्हा जेव्हां मला त्याचं स्मरण होतं, तेव्हां तेव्हां मला बराच वेळपर्यंत कांहीं एक सुचेनासं होतं. तो जर जगता तर तो खास सवाई भाऊ झाला असता. बाबूराव-खचित झाला असता ! माधव-बरें, बाबूराव, जे शिपाई लढाईत पडले व जखमी झाले त्यांच्या बद्दलची काय व्यवस्था केली आहे ? बाबूराव-सर्वांची हजिरी घेऊन, जे लढाईत पडले असतील, त्यांच्या वारसास वेतन करून देण्याचं, जो कोणी सरकारची नौकरी करण्यास तयार असेल, त्याला त्या जागी कायम करण्याचं, व जखमी झालेल्यास पोटगी देण्याचं वगैरे काम रोज कचेरीत नानांच्या समोर चालत असतं, आणि ते