पान:माधवनिधन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ लढाईत मर्दुमकी केली, असं मला तर कांहीं बोवा वाटत नाही. आपल्या फुशारकीचे व बहादुरीचे आपणच पोवाडे गाण्याबद्दल, निजामाच्या वेडेपणाचे जर आपण पोवाडे गायले तर मला वाटते तें याहून बरं ! तूं आघाडीवरच होतास, पहिला हल्ला तुझ्यावरच पडला होता, तेव्हां तूंच सांग बरं, शत्रुचा जोर कितपत होता तें ! आली तर तंबूंतच बसलो होतो ह्मणा. तुमच्याकडून जशी बातमी यायची, त्याप्रमाणे आमचा तंबू पुढे किंवा मागें सरायचा ! माझ्या काकांनी आणि आजोबांनी राक्षसभूवन, उदगीर, वगैरे ठिकाणी घनघोर लढाया मारून, जशी निजामाची आणि हैदरनाईकाची, आणि सावनूरच्या नबाबाची, मारे मारून रग जिरविली, तशी कांही ही खडाची लढाई झाली नाही. तशी, तशी लढाई व्हायला पाहिजे होती, व माझ्या मनांतून तुझा सर्वांबरोबर आघाडीवर यावं असं होतं, पण तसं कांहीच झालं नाही. झालं का? खरं सांग, उगीच माझ्या तोंडासारखं बोलूं नकोस ? आपला जय झाला म्हणून, आपले वाजवीपेक्षां ज्यास्त गोडवे गाणं कांहीं बरे नाही. . बाबूराव-निजामाचा जोर काही कमी नव्हता. त्यांचा आपसांतल्याआपसांत घोंटाळा झाल्यामुळे त्यांची जास्त फजिती झाली ! तो घोंटाळा जर झाला नसता, तर आपल्याला इतला लवकर जय मिळाला नसता हे खास ! पाणी हातचें गेलं, गढीत शिरून आपल्याला कोंडून घेतलं, धांदल उडाली, यामुळे निजामाला अपजय आला. काहींना काही तरी होऊन गर्वाचं घर खाली व्हावयाचेच ! जो दुसऱ्याची नक्कल आपल्या घरी बसून करतो, त्याची नक्कल मग अशीच घरोघर होते. या लढाईवांचन काही आडलं होतं कां ? दरबारांत बसून तमाशा केला, तेव्हां त्याचा सर्व जगभर तमाशा झाला. पण मोठ्यांच्या तमाशाकरितां गरीब विचारे शूर शिपाई मात्र रणांगणांत फुकट बळी पडले. छान झाली, निजामाची चांगली खोड मोडली. तो पुनः असले तमाशे कधीं करायचा नाही. माधव--त्याच्या वेडेपणाच्या कृतीबद्दल त्याला चांगलं शासन मिळालं हैं कांहीं गैर झालं नाही, पण माझ्या मनाप्रमाणे जशी लढाई व्हायला