पान:माधवनिधन.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८] माधवनिधन. बलवंत-काल आलों ! आल्याबरोबर नानांची भेट घेतली, आजही घेतली काम उरकून घेतलं, आणि आज झटलं आल्यासारखं श्रीमंताची भेट घ्यावी, यांचीही भेट करवून द्यावी, आपली उभयतांची भेट घ्यावी, आणि उद्यां मग आपल्या चाकरीवर परत जावं, असा विचार करून आलो. तुम्ही कसचं भेटतां, तुझी तर सध्या श्रीमंतांना जय मिळाला ह्मणून आनंदोत्सवांत दंग ! तुम्हाला आमची आठवण कसची होते. भल्या गृहस्थानो, यजमान विसरले म्हणून तुम्ही देखील आम्हाला विसरावना! ही तुमची आमची मैत्री! दाजीबा-बरं, बरं, म्हणे आनंदोत्सवांत दंग! ( हलकेच ) हे कोण ? बलवंत-हे विजयदुर्गाहून आले आहेत, श्रीमंताच्या श्वशुराकडचे आहेत. भेट घ्यायची आहे, व कांही श्रावण मासासंबंधानं जुळलं तर पहावं ह्मणून आले आहेत. मोठे ज्योतिषी असून विद्वान आहेत. मोरो०--ठीक. बलवंत-श्रीमंताची स्वारी काय करीत आहे ? दाजीबा-बाबूराव फडक्याजवळ बोलत बसली आहे. अंमळ थांबा, वर्दी धाडा आणि मग जा! आम्ही जातो कचेरीत. पण उद्या जायच्या आधी मात्र कृपा करून भेटा. बलवंत-ठीक आहे. . ( सर्व जातात.) प्रवेश तिसरा. स्थळ-शनवारच्या वाड्यांतील आरसेमहाल. पात्र-श्रीमंत सवाई माधवराव आणि बाबूराव फडके बोलत बसले आहेत. ( पडद्यांत गोंधळी लोक पोवाडा म्हणत आहेत.) माधव-बाबूराव, मला वाटतं या आपल्या लोकांना वेड लागलं आहे. एकसारखं रात्रंदिवस पोवाडे गावे, अशी आपल्या लोकांनी या खडाच्या