पान:माधवनिधन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ कामाचा तेव्हांच बोजवारा वाजला असता. या बलवंतराव या, कां सर्व खुशाल ? दाजीबा-काम झालं वाटतं. शिवनेरीस परत जाण्याची तयारी दिसते ? मोरोपंत-राव, येथे येतां केव्हां, जातां केव्हां; तुह्मी तर काहींच आमाला पत्ता लागून देत नाही. मांडलं आहे काय तुमी. राव, नुसत्या भेटी. तून देखील आह्मी गेलों को हो ? बरं बोवा ! बलवंतराव-अहो, मला बोलून तर द्याल की नाहीं ! सर्वच तुह्मी बोलू नका. दाजीबानाही पण जाणार केव्हां ? आतां का संध्याकाळी ? बलवंत-आताही नाही आणि संध्याकाळीही नाही. मोरोपंत--तर मग रात्री जाणार असतील! बलवंत--नाही, आतां नाहीं, संध्याकाळी नाही, आणि आज रात्रीही नाही. उद्या रात्री जाणार आहे. दाजीबा-त्याचंच नांव तें! आज नाही उद्यां! राव, इतकी जर तुह्माला जाण्याची निकड असते, तर येथे येतांहो कशाला ? व आझाला नुप्ततं भेटता तरी कशाला ? चला चालते व्हा! बलवंत-अहो, श्रीमंत माधवाचं दर्शन घ्यायचं झालं, झणजे दोघा जय. विनय द्वारपालांचं आधीं दर्शन घ्यायला नको का? मोरोपंत-ह्मणून आमचं दर्शन घ्यायचं ! बाकी मनापासून कांहीं नाहीं इच्छा ! बलवंत-ह्मणा बोवा काय वाटेल तें ह्मणा ! फारा दिवसाच्या व लहाणपणच्या स्नेहांची गांठ पडली, ह्मणजे मग तेथे कांहींच चालत नाही. ते जे मग बोलतील ते ऐकून घेणं भाग आहे. तरी बरं, की प्रत्येक वेळेला तुह्माला भेटल्याशिवाय जात नाही ह्मणून बरं आहे, नाही तर तुझी आमच्यावर काय कहर उसळून दिला असतां, आणि आमची काय दशा केली असतीत तें प्रभु जाणे! दाजीवा-बरं पण आलेत केव्हां ?