पान:माधवनिधन.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८] माधवनिधन. जना करीत येणाऱ्या निजामाची खोड मोडण्याची विलक्षण अक्कल नानांचीच ! इतरांची तर अशा प्रसंगी अक्कल गुंगच व्हावयाची ! सध्यां जी दिन दुनिया रात्रंदिवस " यशवंत फडणीस नाना, यशवंत फडणीस नाना," म्हणून त्यांचे पोवाडे गात आहे, ते अगदी यथार्थ आहे. राज्याला मंत्री असावा तर असाच असावा! दाजीवा-यांत काय संशय! श्रीमंताचं देखील लहान वय असून केवढं धैर्य, केवढा उत्साह, काय चातुर्य, केवढा अभिमान. भागानगरचे वकील गोविंदराव काळे, आणि गोविंदराव मामा पिंगळे यांनी निजामाच्या दरबारांत केलेली प्रतिज्ञा ऐकून लागलीच स्वारीनी " तयारी करा" म्हणून हुकुम सोडला. मोरोपंत-लहानपणापासून आपल्या देखरेखीखाली आणि मोठ्या काकजीनं जोपासना करून नानांनी वाढविलेल्या झाडाचे फळ गोड असायचेच ! दाजीबा--जसं नानांचं पोटच्या पुत्राप्रमाणे श्रीमंताच्या ठिकाणी प्रेम आहे, तशीच श्रीमंतांचीही नानांच्या ठिकाणी अत्यंत भक्ति आहे. मोरोपंत-नानांची श्रीमंतांशी तशीच वर्तणूक आहे. पाटिलबोवाचा कावा नानांच्या आणि तात्यांच्या जितका लवकर लक्षात आला, तितका दुसऱ्या कोणाच्याही लवकर आला नाही. दाजीबा-श्रीमंतांच्याही तो तितकाच लवकर लक्षात आला; नाही तर या वेळपर्यंत ब्राम्हणशाई लयाला जाऊन शिदेशाई केव्हांच झाली असती. मोरोपंत-कोणाचे कसे डावपेंच आहेत, कोण कसा आहे, कोणाचा कोणच्या वेळी उपयोग होईल, कोण कोणच्या लायकीचा मनुष्य आहे, कोण कोणचं काम चांगलं करील; वगैरे प्रत्येक मनुष्याची पारख नानांना जितकी आहे, तितकी दुसऱ्याला कचित् असेल. (इतक्यांत बलवंतराव नागनाथ व वैजनाथभट्ट येतात.) हे पहा ( त्यांच्याकडे पाहून ) त्याचं प्रत्यक्ष उदाहरण. या बलवंतराव नागनाथांची ज्या कामी त्यांनी योजना केली आहे, त्या कामावर दसध्या एखाद्या लेचापेचा पागेदाराची जर तेथे नेमणूक झाली असती, तर