पान:माधवनिधन.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ प्रवेश दुसरा. स्थळ-शनवारच्या वाड्यांतील आरसे महाला पुढचा दिवाणखाना. ___पात्रे दाजीबा आपटे आणि मोरोपंत भावे येतात. दानीबा-कां मोरोपंत, त्या बुढ्या निजामाला असं वाटलं होतं की, सध्यां पेशवाईत कांही रामच राहिला नाही; पेशवाईत कोणीच कर्ता, मुत्सही, शूर वीर आणि बाणेदार पुरुषच राहिला नाही, आणि ह्मणूनच त्यानं आणि त्याच्या त्या मस्त दिवाणानं आमच्या श्रीमंतांची आणि नानांची सोंगं तमाशांत आणली होती. त्या मशिरउन्मुलुखास ह्मणावं की, लेका तूं तर आमच्या धन्याची सोंगंच तुझ्या तमाशांतल्याच दरबारांत आणून ती सर्व मानकरी लोकांस दाखविलीस; पण तुझं प्रत्यक्ष सोंग आतां पेशव्यांचे चाकर दारोदार हिंडवून पुण्यांतील लहान मोठ्या सर्व बायकांपोरांसही दाखवीत आहेत ! ! श्रीमंतांचा पुण्यप्रतापच तो! मोरोपंत-श्रीमंतांचा पुण्यप्रताप तर खराच, पण नानांची कर्तबगारी कांही कमी नाही. श्रीमंत नारायणराव पेशव्यांचा वध झाल्यापासून या मराठी राज्यावर, या आपल्या पेशवाईवर गृहकलहामुळे केवढालीं अक्कल गुंग करून टाकणारी तुफानं आली; त्या सर्व तुफानांतून हे महाराष्ट्र राज्यरूपी तारूं धैर्यानं तडीस नेऊन लावणारे खरे नाविक एक नानाच! पेशव्यांचा वैभव रवी उदयचलावर आणून सर्व हिंदुस्थानांतील लोकांचे डोळे दिपवून टाकणारे प्रति अरुण एक नानाच! यांत काही शंका नाही. दादासाहेबांचं बंड, फिरंग्यांचे डावपेंच, निजामाची. कारस्थानं, टिपूच्या गुरकावण्या; इतक्या सर्वांना जागच्याजागी जिरवून, खरड्याच्या लढाईच्या वेळी सर्व म. राठे वीरांस एका निशाणाखाली आणण्याची अजब युक्ति अशी नानांचीच! इतकी कुलंगडी मागे असून, “जवळ जवळ एक लक्ष सैन्य घेऊन पुणे जाळून टाकून त्याची राख पेशवे, त्याचे मंत्री नाना, आणि त्यांचे ब्राह्मण सरदार, यांना अंगाला फांसायला लावून हातांत तुंबा देऊन काशीस रवाना करीन, आणि मराठे वीरांस शेतं नांगरायला व मेंढ्या चारायला लावीन." अशी ग