पान:माधवनिधन.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८] माधवनिधन. मैना--अरे माझ्या बरोबरीचा पाहिने ! कोंडाजी-आन मी तुझ्या बरोबरीचा नव्हे कां ? बघ की ठेंगणा असलो तरी बी तुझ्याहून चार बोटं उचच आहे [ तिच्या जवळ जाऊन तिच्या बरोबरीने उभा राहतो. ] मैना-[ त्याला दूर ढकलून देऊन ] मेल्या उंचीनं नव्हे, माझ्या योग्यतेप्रमाणे पाहिजे. कामाठ्याशी पाट लावलेला ऐकला ह्मणजे माझ्या दुसया सोबतीणी मेल्या तोंड काढून देणार नाहीत. कोंडाजी--बरं त्ये राहिलं ! मी जर मोठा जासूद, हुजऱ्या, शिपाई बच्या झालो, तर मग तर लावशीलना माझ्याशी पाट ? मैना-तूं आतां शिपाई बच्यारे कसा होणार ? तुझा बाप मरून गेला आणि आईही मरून गेली, आणि ते सुद्धा कामाठीच होते. मातारपणी तुझ्या बापाला काही शिपाई होता आलं नसतं. कोंडाजी-अग सटवे तसं नव्हे. मी शिपाई गड़ी नाहीं कां होनार? मग काय, बोल बोल, लावशीलना माझ्याशी पाट ! [ तिचा हात धरतो. ] मैना-तूं आधी हो तर खरा ! मग पाहता येईल. चल सोड हात ! त्या पहा बाईसाहेब तिकडे जाताहेत, त्यांनी पाहिलं तर काय ह्मणतील ! जाऊं दे मला ! ( हाताला हिसडा देऊन जाते. ) कोंडाजी-( आपल्याशी ) आपल्यालाही ह्या चौक झाडण्याचा आतां कट्टाळा आला, आपण सोडनार हे काम. नग इचिभन अक्सी केरांत आणि पोतेयांत राहनं. ही मैना लई फटाकडी आहे. बोलती बी गोड, आन उडतीबी लई. हिला धरली पाहिजे. नाही तर दुसरा पोपट हिला उडवील ! कांही तरी करून बामनावानी, हाकडचं तकडं, तकडचं हाकडं, कुत्रयाचं पाय मांजरावर, मांजराचा पाय कुतच्यावर करूनशेनी जासूद, नाही तर हुजऱ्याच झालं पाहिजे. शिपाई होनं नग. फुकाट एखादः दिवसीं ढेकनावानी मेलं ह्मणने मैना गेली आन सगळच गेलं !! [ जातो.]