पान:माधवनिधन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ खटरं! मी कमवीत नाही, कां माझ्या बान कमावलं न्हाई, कां माझ्या आईन कमावलं, नाही ? माझ्या बानं कमावलं, माझ्या आईनं कमावलं, आन मी बी गडी कमावतो आहे का नाही ? म्हणं चोरलं ! मग मैना कवा कवा पाट लावनार ? सांग की, तुझं बी दिस फुकट जातात, आन माझं बी जात्यात. दोन वर्सापासून तुझ्या पाठीमागं लागलोया, तवाच पाट लावला असतास ह्मणने या दोन वर्सीत दोन पोरं नसती झाली. लवकर पोरं झाली ह्मणनी मातारपणी तुझ्या आन माझ्या हातापायाला उपयोगी न्हाई पङनार? मैना-पहा मेला पोराकरितां कसा हापापला आहे तो! मेल्या तूं बोलून चालून कामाठी, केर काढणारा, तूं कां श्रीमंताजवळचा हुजन्य, जासूद, नाईक, जमादार, कां शूर शिपाई आहेस तर तुझ्या बरोबर पाट लावू ? कोंडाजी-मी कामाठी, राह्यलं. आनि तूं ग कोनच्या राजाची रानी ! मसनांतल्या झोटिंगाची व्हय ! इचभन मला कामाठी मनते ! मी जसा कामाठी आहे तशी तूं नाहींसकां बटीक ! तुझी आजी बटीक होती, आई बटीक होती, आन तूं बटीकच आहेस ! पन पाट लावल्यावर तुला जर पोरगी बिरगी झाली तर तिला मात्र बटिक नाहीं करूं देनार ! इचभनं बटकी झाल्या मनने धा मानसांत राहून चटोर होत्यात. मग तुझ्यावानी हाकडं बघ, तकडं बघ, हाकड धांव तकड धांव, ह्यो नको, त्यो पाहिजे; असं करायला लागत्यात ! एका जागी कधीच त्यांचा पाय टिकत नाही. मैना-केर काढतां काढतां, अंगावर केर किती उडाला आहे, शेणानं चौक सारवता सारवता अंगाला शेणाची तरी कोण घाण येते आहे ! ओ ! ( ओकारी देते व धुंकते ) नको मेला असला कामाठी. कोंडाजी-तुझ्या अंगाला असी अत्तरच फासलंय नव्हं! काय सटवाई बोलतीया ! बाईसाहेबाजवळ राहिलयिा, ह्मणून लई दिमाख लावतीस व्हय ! ठावं आहेस की दोन वर्सीमागं याच्या त्याच्या घरी दळाण दळीत होतीस ती! हाताचं घट्ट अजून गेलं नसतील ! तुला जामूद, हुजन्या, शूर शिपाई नवरा होवा व्हय ? कामाटी नग?