पान:माधवनिधन.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८] माधवनिधन.. मैना-मेल्या तुझ्याशी रे पाट लावायचा! मोठा मेला मदनाचा पुतळा पडला किनई. असल्या कामाठ्याशी कोण पाट लावायला बसलं आहे ! माझ्या खेटराशी लवि मेल्या पाट! म्हणजे रोज कामाठ्याचं काम करतां करतां तुझं आंग दुखून आलं, कंबर मोडली म्हणजे मग चांगली माझ्या लाथांनी रगड रगड रगडून घ्यायला सांपडल. कोंडाजी--पाट लावला म्हणजे, बायकुच झालीस, आन बायकुच झालीस म्हणजे, भाकर कराया हुवी, पानी भरायला हव, माझं आंग रगडाया हव, रोज पाय दाबलं पाहिजे, समदं केलं पाहिजे, त्यांत इकतंस जर चुकलं तर कोंडाजीची लाथ बसली बघ बककन पेकटांत! मग तुला अशी गुलजार गुलाबाच्या फुलावानी घरांत ठेवीन की, समदं जन पहातच राहतील! पन मग तुला अशी कोंबड्यावानी इकडं तकडं धांवू नाहीं देनार! बरं कां ?.. मैना- अरे मेल्या तुझ्याशी पाट लावायला तयार आहे कोण? तूं मेल्या चार रुपड्याचा कामाठी, केर काढणारा! तुझ्याजवळ आहे काय? कोंडाजी-काय म्हणजे, बघ की मी कसा ताकदवाला आहे तो, माझ्या बानं आन आईनं मिळून तीन संभर रुपयं टिवलंत, रुपय. त्याचं तुला, गोट करीन, वाकी करील, सरी करीन, तोडं करीन, जोडवी करीन, दंडांतलं बाजूबंद करीन, मोठी झपकेदार नथ करीन, आन लफेदार लुगडंबी घेईन. । मैना-सगळं मेल्या त्या तीनशे रुपयांत करणारना तूं ? ए बोकडा, असं कोणाजवळ बोलूं तरी नकोस! नाही तर या कामाठ्याजवळ इतके रुपये कुठून आले म्हणून वहिमानं तुला चोर म्हणून पकडून चावडीवर बसवून ठेवतील आणि चांगले चाबूक मारतील. कोंडाजी-कोणा लोकाची मा व्याली मला चोर म्हनन्याची. येऊं दे त्याला माझ्या म्होरं म्हणजे एक्या हिसक्याबरोबर त्याचं थोबाडच फिरवन देईन ! हैं तूंच म्हनालीस म्हणून गप्प बसलों, नाही तर दावला असता कचका! म्हनं चोर म्हनतील! कां इचभन चोर म्हनतील ? कुनी मला पकडलं काय ? पकडलं तर खरं म्हनन, नाही तर मारीन या पायांतली