पान:माधवनिधन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ जा. नेहमीप्रमाणे हे पहा मला आजही शुभ शकून होत आहेत, त्यावरून मी हाती घेतलेल्या कामांत मला खास यश येईल असं वाटतं. सत्यभामा--कोल्हापूरची अंबाबाई तसंच करो. ( दोघे निघून जातात.) अंक २ रा प्रवेश पहिला. - स्थळ-शनवारच्या वाड्यांतील चौक. पात्रे-कोंडाजी कामाठी हातांत केरसुणी घेऊन, तोंडाने गाणं - ह्मणत केर काढीत आहे. कोंडाजी-(गाणे) बघनार, बघनार, होय बेनार, करी ही चार, अशी ही मैना, मारुनि इप्कीचे बाण करी दैना! ॥ १॥ फांकडी, लावि लाडिगुडी, घालि फुगडी, अशी ही मैना, मारुनी इष्कीचे बाण करी दैना ॥२॥ ( इतक्यांत मैना मोलकरीण येते. ) मैना -( त्याच्या डोक्यांत लहानशी थप्पड मारून ) काम करितां करतां हे तोंडानं काय चाललं आहे. कुठली असली मैना आणली आहेस. कोंडाजी--(वर पाहून) अग वा ग वा ! तूं कवा आलीस? तरी म्हटलं या पठ्ठयाला डोक्यांत असं नाजूक हातानं मारनार कोन हाय ! इचिभन मैना, मैना! दुसरं कुणी असतं, आणि त्यानं मला असं मारलं असतं, म्हणजे दावला असता त्याला माझा हिसका! पण बघतुया तो मैना! मैना, मैना तुला सदर परवानगी! मार, मार, पन मैना डोळं नग मारूं! आन डोळं मारायचं असलं तर पाट कवा लावनार ते कबूल कर पहिल्यानदां!