पान:माधवनिधन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८ माधवनिधन. तर तसं होऊ दिलं नसतं. सध्यां स्वारीला एकटंच जाऊं द्यावं. पुढे पाहता येईल. ( बाजूला पाहून ) ती पहा स्वारी श्रीमंत बाजीरावसाहेब पेशव्यांचा निरोप घेऊन आली बरं! चेहऱ्यावर तर उत्साह, आनंद आणि हासणं दिसत आहे. ( इतक्यांत बलवंतराव नागनाथ पुण्यास जाण्याच्या तयारीने येतो.) बलवंत-( आश्चर्याने आणि हांसत हांसत ) अरे वा; तूं तर आमची वाट पहातच दारांत अजून उभी आहेस म्हणायची! सत्यभामा-इकडचा उत्साह, इकडचा आनंद, इकडचा जय झालेला पाहून मला जितका मनापासून आनंद होईल, तितका दुसऱ्या कोणाला होईल का? त्याचा अर्धा वाटा आपल्याबरोबर घेण्याकरितां मला वाट पहातच वसलं पाहिजे. आपल्या मनांतून द्यायचा नसेल, पण मी तो घेतल्याशिवाय कधीच राहयाची नाही बरं कां ? (त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात धरते.) बलवंत-तुमचं तुम्हाला घ्यायला कोणाची आडकाठी आहे. बरं आहे, येतो आम्ही, बाहेर माणसं खोळंबून उभी आहेत. मागचा नीट बंदोबस्त ठेवा, आम्ही लवकरच परत येऊ. पण दोन चार दिवसांनी स्वारा हाती इकडील सर्व कुशल वर्तमान कळवीत जा. तुम्ही परवां म्हणाला होता की, माझ्यासारखी बायको देखील शिवनेरी किल्ल्याचा बंदोबस्त ठेवील, त्या परीक्षेची आतांच वेळ आहे. पाहूं कशा कसोटीला उतरता तें! सत्यभामा ते सर्व परत आल्यावर कळेलच. बलवंत-जा आतां आपण! मागची काळजी आपल्याला आहेच! सत्यभामा-आपण मागची मुळीच काळजी करूं नये. सर्व लक्ष आतां पुढे ठेवावं. निश्चय मात्र ढळू देऊ नये बरं कां ? तें लक्षात राहीलच म्हणा, पण उगीच सुचविते. बलवंत-( जातां जातां) किल्ल्याच्या दरवाजाच्या सर्व किल्लया सं'याकाळी तूं आपल्याजवळ आणून ठेवीत जा; आणि रोज सकाळच्या प्रहरी नमादार वर्दी देण्याकरितां जेव्हां येत जाईल, तेव्हां त्याच्या स्वाधीन करीत