पान:माधवनिधन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [ वर्ष ७ मन आमच्याविषयी कसं आहे, त्यांचा आमच्याकडे कितपत ओढा आहे; हे यावरून पहिल्यानं पहावयाचं आहे; आणि त्याप्रमाणे मग पुढे! तुमच्याविषयींही मी आतां त्यांना लिहितोंच, पण तुझी हे पक्कं लक्षात ठेवा की, असाही एखादा दिवस येईल की त्या दिवशी तो आणि मी एक होऊन तुह्माला प्रती नाना, नाना, ह्मणने मुख्य मंत्री बनवू ! अहो एकाच रक्तमांसापासून झालेले हे आमचे दोघांचे देह, आणि जीव केव्हां तरी एक होणारच ! आणि ते एकदा एक झाले झणजे मग असे तुमच्या नानासारखे शेकडो मुत्सद्धी एक झाले तरी ते त्यांच्याने अलग करवणार नाही. आमी ज्याला नाना करूं तो नाना होईल. नदीच्या ओघाचे प्रवाह असल्या बांधाने का कायमचे बांधले जातात. पूर आला ह्मणजे ते बांद फोडून लागलेच एकमेकाला मिळतात, आलंना तुमच्या लक्षांत. त्याप्रमाणे वागा. बलवंत-आले, पूर्ण लक्षात आले ! त्याचप्रमाणे करतो, आज्ञा असावी. [ जातात.] प्रवेश ४. स्थळ-शिवनेरी किल्ल्यांतील बलवंतराव नागनाथांचा वाडा. पात्रे-सत्यभामा येते. सत्यभामा-[ आपल्याशी ]. या दोन दिवसांत तर स्वारीचा निश्चय बदलला नाही, तेव्हां आतां तो फार करून तसाच टिकेल असं वाटतं; आणि तो तसाच टिकला पाहिजे. या असल्या धोपट मार्गानं जाणाऱ्या सरळ माणसांना कुठं कुठं वळणं येतात, त्या त्या वेळी त्यांना जागं केलं पाहिजे. तेवढं चकलं, की चकला यांचा रस्ता. तेव्हां अजून थोडीशी नानांची भेट झाल्या. वर काय होतं त्यांची भिती आहे. पुण्याहून परत आल्यावर जर निश्चय सध्या आहे असाच कायम राहिला, तर मग काम झालं ह्मणून ह्मणायला कांही एक हरकत नाही. सध्या मला बरोबर जातां येत नाही, नाही तर मी तेथपर्यंतही गेले असते, आणि स्वारीचा निश्चय लटपटण्याची वेळ येती