पान:माधवनिधन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८ . माधवनिधन. - बाजीराव--तसा सुयोग जेव्हां येईल तेव्हां खरा! बरं, उद्यांच जाण्याचा तुमचा विचार झाला कां ? बलवंतराव-फार करून उद्यांचाच ठरेल! बाजीराव--तसा तुमचा बेत नक्की झाला ह्मणजे मला पंतप्रधानास देण्याचं पत्र लिहून तयार करण्यास ठीक पडेल ! आप्पा-बाबासाहेब तुह्मी श्रीमंत पंतप्रधानास पत्र पाठविणार ! मी देऊं कां त्यांना पाहण्याकरितां आपली बारिक अक्षराची पुस्ती पाठवून ? बाजी-हो दे दे ! आप्पा-आणूं आतां ! आणतों अं! (असें ह्मणून उड्या मारीत जातो.) बाजी-ज्या त्या कामाची त्याला केवढी हौस ! बलवंत-श्रीमंतांनी लिहून तयार करावं ! मी सकाळी जातांना भेटून जाईन. बाजीराव-हो, जातांना या वैजनाथभटजीसही घेऊन जा ! यांची व पंतप्रधानांची भेट करून द्या. हे त्यांच्या श्वशुराच्या गांवचेच आहेत मोठे विश्वासूक, विद्वान् , जोतीषशास्त्रांत निपूण असे आहेत. तुमच्याही परिचयाचे असतीलच ! बलवंत-हो, माझा यांचा नुकताच परिचय झाला आहे. वैजनाथ--रावसाहेबांची आणि त्यांच्या कुटुंबाची मी पत्रिका पाहिली आहे. योग सर्वोत्कृष्ट आहे. दोघांची अत्यंत प्रीति आहे. जोडा मोठा नामी. गण मैत्री उत्तम ! आणि ह्मणूनच परमेश्वराने असा नेमानेम केला.. प्रभूची योजना अन्यथा थोडीच व्हावयाची आहे. जसे हे तशाच बाई देखील रूपवान, गुणवान् आणि भाविक आहेत. योजना अति अति उत्तम ! रावसाहेबांचा राजयोग मोठा चांगला आहे. बाजीराव--बरें मी फराळ झाल्यावर ते लिहून तयार करतो. भटजी, जा तुझीही आपल्या तयारीला लागा.. वैजनाथ--आज्ञा श्रीमंतांची ! ( तो जातो.) बाजी--या संबंधानें कोणालाही मागमूस लागून देऊ नका. माधवरावाचें N