पान:माधवनिधन.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ कादंबरीसंग्रह पुस्तक नाला. [वर्ष ७ बरोबर घेऊन नेण्याकरितां येतो, मग आपण जाऊं ! आपली स्वारी श्रीमंत पंतप्रधान पेशवेसरकारच्या बरोबरीची होईल अशी काढूं ! सद्यां नको! आप्पा--बरं तर सध्यां नको ! बाबासाहेब, आपण दसऱ्याला पुण्याला जाऊं ! तुह्मीही यालना; त्या दिवशी मात्र मी ऐकणार नाही नाहीतर आतां जसं तुझी मला नको ह्मणतां तसं तेव्हाही ह्मणाल. (बाजीरावाच्या गळ्या पडतो.) बाबासाहेब, बाबासाहेब, खरंच चलालना ? न्यालना मला आपल्या बरोबर ! मी तिथं जाऊन श्रीमंत पंतप्रधानास मला घोड्यावर कसं बसतां येतं, भाला कसा फेंकता येतो, बाण कसा सोडता येतो, सर्व त्यांना दाखवीन अं! आणि मग काल जशी मी तुमच्याशी शर्यत लावून तुह्माला मागं टाकलं, तशी पंतप्रधानाशी शयत लावीन. त्यांच्यापुढे आपला घोडा भरधाव काढीन, त्यांना मागं टाकीन, आणि शर्यत जिंकून त्यांच्या बरोबरीनं गादीवर बसेन आणि पेशवा होईन. बाबासाहेब, तुह्मी दखील घोडे फिरवायला आमच्या बरोबर याल ना ? बाजीराव-पाहिलांतना कसा बोलतो तें! हो येऊं बरं, सर्व करूं! वलवंत--हो, आप्पासाहेब, तुझी तोपर्यंत बाबासाहेबाजवळ घोड्यावर बसून बोथाटी फिरविण्याचा चांगला अभ्यास करा. श्रीमंत पंतप्रधान देखील घोड्यावर बसण्यांत बाके आहेत. ' आप्पा-मी देखील नाहीं कांहो बाबासाहेब ! बाकां ! बाजीराव--छे, तूं नाहींस बाकां. आप्पा--मी आतांशा घोड्यावरून पडतो कां ? बाजी--पडला नाहींस ह्मणून काय झालं ! पण तूं कांहीं बांका नाहीस. आप्पा--नाही, मी आहे जा ! बाजी--आहेस, पण तो कुठं दिसत नाहींस तो! चांगला सरळ आहेस! तूं कुठं बांका, वांकलेला असा आहेस कां ? . आप्पा--मी कां मातारा आहे ? हे पागेदार आहेत वांकलेले. बलवंत--या यांच्या लीला पाहून श्रीमंतात किती तरी आनंद होईल ! वैजनाथ-सिंहाचा बच्या तो, तो आपला गुग कध्धी सोडणार नाही.