पान:माधवनिधन.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुलई १८९८] माधवनिधन. मला वाटत नाही. याचा मुख्य चालक निराळाच आहे. बरं ही अशी आमची स्थिती खरोखर त्यांच्याच हुकूमानं झाली की, काय याबद्दल एकदा आपल्या मनाची शहानिशा करून घ्यावी, आणि मग आपल्या दैवावर हवाला ठेवून स्वस्थ बसावं, ह्मणून तुमाला ही विनंति केली आहे. बलवंतराव-श्रीमंत, मला-आपल्या चाकराला-विनंती करायची! छे, असं आपण मुळी ह्मणूं नये! हुकूम करावा. आपलं काम मी खास करतों, त्याबद्दल श्रीमंतांनी बेफिकीर असावं ! फक्त आपलं पत्र श्रीमंत पंतप्रधान माधवरावसाहेबास गुप्त रितीनं द्यायच एवढच ना ? बाजीराव-हो, सध्यां एवढंच काम आहे ! काय कराल तें खरं. आमची सर्व भिस्त तुमच्यावर आहे. बलवंत-श्रीमंताच्या कामाकरितां, पुण्याचं एखादं काम काढून मी उद्यांच पुण्यास रवाना होतो. - आप्पा--कोण, पागेदार, आपण पुण्यास जाणार ? बाबासाहेब, मी जाऊं कांहो यांच्याबरोबर पुण्यास ! आमी पुणं कधीच पाहिलं नाही. तिथं मोठी मौज मौज आहे, असं आपले गणू, सद्या, नाय हुजरे सांगतात. अं-अं. - बाजीराव--पाहिलांतना याचा हट्ट ! आतां या पोराला काय सांगावं ? यावेळपर्यंत आपल्या चाबकाशी खेळत होता, तोपर्यंत त्याला काही त्याची आठवण नव्हती. तुमच्या तोंडून पुण्याचं नांव निघण्याचा काय तो आवकाश! तें ऐकिल्याबरोबर त्याला त्याची आठवण झाली. बाळ, आप्पा-- सध्यां किनई पाऊस पडतो आहे, बरोबर चांगला बंदोबस्त नाही, ह्मणून सध्यां नको, आपण मग पुढे केव्हां तरी जाऊं. आप्पा--हे पागेदार आहेत तर खरे आमच्या बरोबर ? नाही-आम्हीजाणार-पुण्याला-अं-अं. बाजीराव--( त्याला जवळ घेऊन ) बाळ आप्पा, असा हट्ट करूं नये ! बलवंत- हे पहा आप्पासाहेब, मी पुढे जातो, आपल्या स्वारीचा नीट बंदोबस्त करतो, मग श्रीमंताचा हुकूम घेऊन मोठ्या थाटानं म्वार शिवबंदी