पान:माधवनिधन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [ वर्ष ७ बाजीराव-हे पहा बलवंतराव नागनाथ, येथील पागेदार आणि आमच्या वरचे रखवालदार आले. या बलवंतराव असे. बलवंत--छे, श्रीमंतांनी असं ह्मणूं नये ! श्रीमंतांवर रखवाली करणारा कोण आहे ! आमी आपल्या पायाचे चाकर आहोत. ज्या नोकरीबद्दल आज्ञा होईल ती बजावण्याचं आमचं काम आहे. चाकर झालं ह्मणजे निरुपा. यास्तव कित्येक गोष्टी कराव्या लागतात; त्याला नाईलाज आहे. बाजीराव--(त्याचा हात धरून ) बलवंतराव, तुमची येथे नेमणूक झाल्यापासून तुह्मी आमची वर्तणूक पहातच आहां; आमाला किल्ल्याबाहेर मुद्धा जाण्याची परवानगी नसावी, असं आमी त्या कारभारी साहेबांचं काय बरं घोडं मारलं आहे? माझं असो, पण हा आप्पा, भलत्यावेळी भलतांच हट्ट घेऊन बसतो, आणि तो हट्ट आता आपल्या हातून पुरवला जात नाही, ह्मणून अत्यंत वाईट वाटतं. दादांचा व आईचा तो इतका प्यार असे की, ते त्याला एक क्षणभर सुद्धां खाली ठेवीत नसत. त्याच्याकडे पाहिलं, आणि त्यानं मटलेलं आपल्या हातून झालं नाही, ह्मणजे मग आमाला आमच्या बंदीवासाच्या व परतंत्रपणाच्या असह्य वेदना होऊ लागतात. त्याच्याकडं पाहून पोटांत कळवळतं, आणि आमी असं काय केलं आहे; याबद्दल वाईट वाटून कांही एक सुचेनासं होतं. कालच त्या राणोजीनं किल्लयाबाहेर जायला आपल्याला हुकूम नाही, असं ह्मणून त्याचा घोडा फिरविल्याबरोबर त्याला इतकं वाईट वाटलं, आणि तो इतला मजजवळ येऊन रडला की, त्याची समजूत काही केल्या लवकर होईना. त्याला अद्याप फारसं कळत नाही ह्मणून बरं आहे, नाही तर त्याच्या स्थितीबद्दल त्यालाही मजप्रमाणेच वाईट वाटून अत्यंत दुःख झालं असतं ! कालपासून पुण्याला केव्हां चलणार, मी जाणार; असाच हट्ट घेऊन बसला आहे. काय करावं त्याच्या हट्टापुढे. सध्या आपली खरी स्थिती सांगून काही उपयोग आहे कां ? गोड गोड बोलून, चाळवून, दुसरीकडे त्याचं मन वळवून त्याला त्या गोष्टीचा विसर पाडावा लागतो. कैद्या-पेक्षाही आम्ही कैदी आहोत, ही अमची स्थिती मगजे श्रीमंत माधवरावाच्या हुकूमानं झाली आहे असं