पान:माधवनिधन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जून १८९८] माधवनिधन. नाही. त्यांतून बलवंतराव नागनाथास मी तुमच्याबद्दल सांगून ठेवलंच आहे. तेही तुमची भेट करून देतील. वेळ साधून आमची स्थिती त्यांच्या कानावर जाईल व त्याचं मन आमच्याकडे ओढेल असं प्रथम करा. त्यांत थोडसं यश येण्याचा रंग दिसला ह्मणजे मग आपल्याला पुढे काय करावयाचे ते ठरवू. जमल्यास बलवंतरावाबरोबरच परत या, अगर दोन चार दिवसांनी मागून या. मात्र इतकं पक्कं लक्षात ठेवा की, आपला पहिला फांसा जसा पडेल, त्यावर पुढचा सर्व डाव अवलंबून आहे. वैजनाथ-माझं भविष्य खोटं होईल याची तर मला मुळीच भिती नाही. माझं भविष्य कसलं, जसं श्रीमंताच्या पत्रिकेंत आहे तसं मी गणित करून सांगितलं; यांत जास्त कांहीं केलं नाही. माझ्या वाणीला परमेश्वराच्या मनांतून जर यश द्यावयाचं असेल तर तो देईल. पण जर माझं भविष्य खोटं झालं, आणि आपण या वर्षी बंदिवासांतून मोकळे झाला नाही, तर पुन्हां हातांत पत्रिकाच धरणार नाही. श्रीमंत पंतप्रधान माधवरावसाहेब यांच्या भेटीत जसं घडेल, तसं मी श्रीमंतास कळवीन. बरं, त्या अनुष्टानांसंबंधाने व प्रयोगासंबंधानं पुण्याहून आमी परत आल्यावरच ठरवायचं ना ? बाजीराव- होय, तुझी परत आल्यावरच त्याचं ठरवू व लागलाच श्रावण शुद्धांत त्याला आरंभही करूं.. वैजनाथ--हो, श्रावणांतच त्याला आरंभ करणं बरं ? बाजीराव--प्रयोग सिद्ध व्हावयाला किती दिवस लागतील ? वैजनाथ-त्याला, अजमासें अठरा दिवस लागतील. बाजीराव-प्रयोग सिद्ध झाल्यानंतर मग पुन्हा एकदां तुह्मास पुण्यास जावं लागेल. वैजनाथ–जाऊं, त्याला काय हरकत आहे. कोणीकडून श्रीमंताचं काम झालं ह्मणजे झालं. शिवाय श्रावणांतील दक्षणा व्हावयाचीच आहे. त्याच वेळेला गेलं ह्मणजे एका कामांत दोन कामें अनायासेंच होतील. ( इतक्यांत बलवंतराव नागनाथ आणि चिमणाजी आप्पा येतात.)