पान:माधवनिधन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ वाटतात, पण जो देव नवसाला पावत नाहीं, तो मेला देव कसला ! धोंडाच तो ! अशा देवाच्या ठिकाणी भाव ठेवायचा कशाला ? नुसतं त्याच्यापुढे कपाळ घासून घट्टे मात्र पडायचे ! त्यापेक्षा जे देव नवसाला पावतात, किंवा पावतील असं आपल्याला वाटतं, त्या देवाची सेवा केलेली काय बरं वाईट ! पण इकडच्यासारख्या एकमार्गी भोळवट आणि शूर वीराच्या मनांत या गोष्टी मुळीच येत नाहीत, आणि त्यामुळेच हे असले लोक नांव-लौकिकाला चढत नाहीत व श्रीमंतही होत नाहीत. झालेला निश्चय स्वारीचा जर टळला नाही तर बरंच काम होईल असं वाटतं. (ती निजते.) प्रवेश तिसरा. - alama स्थळ-किल्लयांतील बगीचामधील मंडप. पात्रे-बाजीराव आणि वैजनाथभट येतात. बाजीराव--वैजनाथभटजी, तुमचं भविष्य जर खरं झालं, आणि मी कधी काळी पेशव्यांच्या गादीवर बसलो, तर तुमाला मी आपल्या बरोबरीचा करून सोडीन. अहो, त्या गादीवर चढतांना तुमचा असा हात धरून, तुझाला मी प्रथम आपल्या उजव्या हाताला तुमच्या गादीवर बसवीन आणि मग मी आपल्या बसेन. या माझ्या वचनाचं मला कधीच विस्मरण होणार नाही ही माझी पूर्ण खात्री आहे; पण कदाचित् झालं तर तुह्मी मला आजच्या दिवसाचं आणि या बागेतील वचनाचं स्मरण द्या. आणि त्या बरोबर ही आंगठी खूण ह्मणून दाखवा, ह्मणजे तुमचं काम झालंच ह्मणून समजा. ( आंगठी त्याच्या हातांत घालतो.) पण पुढची आपली सर्व मनोराज्याची इमारत सध्यांच्या तुमच्या पुण्यास गेल्यानंतरच्या कर्तबगारीवर आहे. तो पाया जितका खोल व भक्कम केला जाईल तितका तो करा. तुझी माधवरावाचे आतांचे सासरे जे गोखले त्यांच्याच गांवचे असल्यामुळे, इतराप्रमाणे तुमाला माधवरावाची भेट घेण्याला फारशी अडचण पडणार