पान:माधवनिधन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जून १८९८] माधवनिधन. ते फार लांब असतात, व असले प्रसंग ते नेहमी टाळतात; असे लोक ह्मणतात, आणि इतकं जर त्यांच्या अंगी धैर्य नाही. व त्यांचं मन कोवळं आहे; मग सर्व गोष्टींत त्यांचं मन तसं कोंवळ कां असू नये? पण तसं त्यांचं सर्व गोष्टींत आणि आपल्या फायद्याच्या गोष्टीत खास नाही. त्यावेळेला तर तें तोफेच्या शेकडों गोळ्यांनी फुटणार नाही, अशा भयंकर काळ्या दगडाच्या तटापेक्षा देखील भक्कम आहे. मग आपल्यासारखा वीर, जो लढाईला जाण्याला नेहमी तयार अतसो, मृत्यूची ज्याला भीति वाटत नाही, ज्याचं धैर्य अभंग; त्याचं मन आपल्या धन्याच्या किंवा ज्याने आपल्यावर विश्वास ठेवला त्याच्या मर्जीविरुद्ध एवढीशी गोष्ट करण्यास कचरावं, हे किती चमत्कारिक ? हे आपल्यासारख्या शूराला शोभतच नाही. त्यांतून बाजीराव साहेबांचं नुसतं पत्र श्रीमंतास नानाच्या न कळत द्यावयाचं व तोंडी निरोप सांगून ते जे ह्मगतील ते उलट येऊन यांना कळवायचं, यापेक्षा काही नाही. त्याकरितां एवढा विचार, एवढी झोपमोड, आणि एवढी त्याबद्दल तोड काढण्याची खटपट !! मी तर त्याबद्दल केव्हांच तोड काढिली आहे. बलवंत-कोणची बरं ती ? सत्यभामा-कोणची ह्मणजे, 'होय' ह्मणायचं आणि लागलीच मोकळं व्हावयाचं! बलवंत--बरं तर तुझ्याच ह्मणण्याप्रमाणे करूं. सत्यभामा—करूं ह्मणून आशिर्वाद कशाला ? मी सांगितल्याप्रमाणे करण्याचा निश्चय करून एकदां अनुभव घेऊन पहावा पाहिजे तर ! निश्चय केला ह्मणजे मग पहायची होती कशी तल्काळ गाढ झोप लागते ती ! (तीन प्रहराचा गजर होतो.) बळवंत-अगं, आपल्या बोलण्याच्या गडबडीत तीन प्रहर रात्र उलटून गेली. झाला माझा निश्चय. सकाळी मला बाजीरावसाहेबाबरोबर फेरफटक्याला जायचं आहे, तेव्हां मला लवकरच उठव. तूंही थोडीशी झोप घे. सत्यभामा-आपल्याला स्वस्थ झोप लागली ह्मणजे मलाही लागेल. (ती त्याला थोपटते, त्याला झोप लागते.) इकडे नाना फडणवीस ह्मणजे जसे देव