पान:माधवनिधन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ ह्मणने विश्वासघात होतो असं काही नाही. आपण त्यांची भीड तोडली नाही मगजे, वेळ प्रसंगी त्यांनाही आपली भीड तोडवणार नाही. ते श्रीमंत आहेत, मोठे आहेत, राज्याचे सवाईमाधवरावाप्रमाणे मालकही आहेत, त्यांचं काम करण्याला वाटेल तो मनुष्य तयार होईल; पण आपण आज त्यांच्या मनाप्रमाणे केलं नाहीं मगने, आपण मात्र आज एक आपल्या फायद्याची आलेली उत्तम संधी घालविली असं होईल. ते श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे ह्मणने जन्मभरपर्यंत कैदेतच राहतील, असं मुळीच नाही. बरं, नाना ह्मणजे आपल्याला जन्मभरपर्यंत याच कामगिरीवर ठेवतील असंही नाही. दुसरी एखादी याहून जास्त नाजूक कामगिरी आली आणि तिकडे त्यांनी आपली योजना केली, मग मग ही सोन्यासारखी वेळ आपण आपल्या हातानं फुकट घालविली असं नाहीं कां होणार? एवढ्याकरितां ह्मणते. बलवंत-एवढ्यावेळपर्यंत मी बराच घोटाळ्यांत पडलो होतो. तुझ्या या सांगण्यानं त्या घोटाळ्यांतून निवण्याला काही तरी तोड़ निघेल, असं मला आतां वाटू लागलं आहे. सत्यभामा-तोड निघेल नव्हे, ती काढलीच पाहिजे. थोडासा आपला मनावर ताबा चालविला पाहिजे. असं होईल का, तसं करूं कां, असं केलें तर लोक काय ह्मणतील, तसं केलं तर आपलं मन आपल्याला काय ह्मणेल; या गोष्टीकडे फारसं लक्ष देऊन उपयोगी नाही. थोडंसं मन घट्ट केलं पाहिजे. मनाचा कनवाळूपणा थोडा कमी केला पाहिजे. धोपट मार्गानं जावं, पण आपल्या डाव्या उजव्या बाजूला काय चाललं आहे हे अगदी पाहूं नये असे नाही. मी मगते, ज्यांचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, व ज्यांना तुह्मी देव समजतां, त्यांचाच कित्ता तुह्मी कां बरं गिरवीत नाही. ह्मणजे वेळ प्रसंगी त्यांनाच निरुत्तर करण्याला ठीक पडेल. शिवाय आपल्या अंगी त्यांच्यापेक्षा एक गुण जास्त आहे. बलबंत--तो कोणचा ? सत्यभामा-तोफेचा आवाज झाला की, नाना अगदी गर्भगळीत होऊन जातात. लढाई प्रत्यक्ष पाहण्याला त्यांना मुळीच नको, लढाईच्या जागेपासून