पान:माधवनिधन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जून १८९९] माधवनिधन. ते आपल्यालाच कां समजू नये ? नानासारख्या कोट्याधीशांना देखील जर आणखी पैसे मिळवावेसे वाटतात, आपला लौकिक सर्व जगभर व्हावा अशी जर त्यांची इच्छा आहे, तर तशी इच्छा आपण कां करूं नये ? नांव-लौकिक व चार पैसे मिळविण्याची इच्छा नाहीं, मोठेपणी मिळविण्याची हौस नाहीं, कांहीं नाहीं; मग आपला सर्वसंग परित्याग करावा आणि स्वस्थ देवाचं नांव तरी घेत बसावं. नुसत्या विश्वासूक पणाला, आणि इनामदारीला करायचं काय ? त्यांत कांही नाही. नानाचा इमानदार चाकर होण्याची इच्छा धरण्यापेक्षां प्रती, 'नाना' होण्याची इच्छा जर धरली तर त्यांत कांहीं तरी अर्थ आहे, बरं कां ? कदाचित् आपल्याला विश्वासूक पागेदारच होऊन राहणं बरं वाटत असेल, पण मला नुसत्या पागेदारणीपेक्षाही जास्त मोठे व्हावं असं वाटतं! बलवंतराव-( आपल्याशी) खरंच नाना जर मनवर इतका विश्वास ठेवतात व मला आपला असं समजतात; मग त्यांनी मला आपला असं मटल्याचं चीज कां बरं करूं नये ? आणि तें करणं त्यांना कांहीं अशक्य नव्हतं. ते सहज होणारं काम जर त्यांच्या हातून झालं नाही, तर मग तें आपल्याला चाहतात असं कसं ह्मणावं? एखादी गोष्ट आपल्या मनुष्यासंबंधानं करावयाची एखाद्याच्या मनांत असली, ह्मणजे मग त्याला त्याचं विस्मरण होत नसतं, आणि ते झालं की, मग त्याला आपली खरी कळकळच नाही असं मंगायला काय हरकत आहे ? त्यांतून नानांना माझं विस्मरण व्हावं असं मुळीच नाही. रघुनाथराव दादासाहेबांचं कुटुंब लक्षात आलं की, बलवंतराव नागनाथ त्यांच्यापुढे उभा राहिलाच पाहिजे. चांगल्या कामगिरीबद्दल भर दरबारांत जर मान झाला नाही, आणि लोकांना आपण माहित झाली नाही; तर मग ती चांगली कामगिरी बजावल्याचं चीज तें होणार केव्हां ? खऱ्या वेतनाच्या बरोबरीचीच दरबारांतल्या मोठ्या मानाची योग्य ता आहे. यावरून ही ह्मणते त्या गोष्टी कांहीं खोट्या नाहीत. सत्यभामा-मी मगते ते खरं असं आपल्याला वाटतं का? बरं श्रीमंत बाजीराव साहेब पेशव्याचं आपण एखादं काम केलंत मगने त्यांत नान वा