पान:माधवनिधन.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ बलवंत-तूं ह्मणतेस तें खरं, पण त्यांनी आपणावर जो विश्वास टाकला, त्याप्रमाणे आपण चालला नाही, असें आपलं मन आपल्याला मागून नाहीं कां सांगणार ? सत्यभामा–दुसरा जर आपला फायदा पाहतो आहे, तर आपण आपला कां पाहूं नये ! मी ह्मणते की, नानांनी आपणावर पूर्ण विश्वास ठेवला, मोठी नाजूक कामगिरी सांगितली, यापेक्षा जास्त दिलं काय ? काही त्याबद्दल जास्त नेमणूक कां दिली ? नुसता ह्मणे पूर्ण विश्वास ठेवला, नाजूक कामगिरी सांगितली, आणि गळ्यांतला अगदी ताईत असं मानलं; पण त्याचा कांहीं उपयोग आहे का ? कांहीं नाहीं ! उलट ही आपल्याला नाजूक कामगिरी सांगून त्यांनी आपलं नुकसान केलं आणि स्वतांचा मात्र फायदा करून घेतला. परवाच्या खरड्याच्या लढाईत, जर आपण आपली पागा घेऊन गेला असता, तर सर्वांवरोबर आपल्यालाही इनाम मिळालं नसतं का? आपण तरवार गाजविली नसती कां ? त्यामुळे आपला नांव-लौकिक झाला नसता कां! आपली दरबारांत प्रतिष्ठा वाढली नसती कां! आपण आपल्या पराक्रमानं पूर्वीपेक्षा जास्त आपण श्रीमंताच्या नजरेखाली नसता का आला ! हे सर्व फायदे नानांनी आपले बुडविले बरं ! विश्वासूक, इमानदार असं नुसतं तोंडानं मगून इथं आपल्याला मेंब्या राखायला ठेवलं ! दांत, व नखं काढून घेऊन, हात पाय बांधून, जिन्यांत कोंडलेल्या वाघाची राखण ती काय करायची ? आणि त्याला एवढा मोठा शूर असा पागेचा अधिकारी तरी कशाला पाहिजे. माझ्यासारखी एखाद्या पागेदाराची बायकोसुद्धा तें काम सहज करील. आपल्याला आतां एक दोन दिवसांत पुण्यास जायायचंच आहे, तेव्हां पहावी पाहिले तर माझ्याकडे ती कामगिरी सोपवून, मी ती बजाविते की नाही ते, आणि व्यावी आपली खात्री करून ! विश्वासूकपणाबद्दल, नाजूक कामगिरी उत्तम रितीनं बजावल्याबद्दल, ते जर आपल्याला अगदी गळ्यांतला ताईत ह्मणूत समजतात; तर सर्वांबरोबर आपल्याला कां नाहीं नानांनी इनाम पाठवून दिलं, अथवा आपली नेमणूक वाढविली । थोडक्यांत आपलं मोठं काम कसं करून घ्यावं, हे त्यांना जर समजतं; तर